डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. ९९ मतदान केंद्रांवर ९ हजार ७९२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे ६५ टक्के मतदान झाले.
ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणारा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून नावलौकिक मिळवलेल्या तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. ९९ मतदान केंद्रांवर एकूण ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीतील पॅनेलप्रमुख तथा विद्यमान अध्यक्ष अरिवद गोरे यांनी केशेगाव, अॅड. व्यंकट गुंड यांनी पाडोळी तर संजय िनबाळकर यांनी उस्मानाबाद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
डॉ. आंबेडकर कारखाना निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अरिवद गोरे यांना अॅड. व्यंकट गुंड अणि भाजपचे संजय िनबाळकर यांनी स्वतंत्र पॅनेल उभारून आव्हान दिले होते. भाजपच्या पॅनेलसोबत लोकमंगल समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख, रोहन देशमुख यांनीही प्रचारात उडी घेतली होती. डॉ. आंबेडकर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत सर्व विरोधक एकवटले होते. मात्र भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक बेबनाव या निवडणुकीतही उफाळून आल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या पॅनेलला सहकार्य करीत शिवसेनेने भाजपपासून चार हात लांब राहणे पसंत केले. तर भाजपनेही या निवडणुकीत आपला स्वतंत्र पॅनेल उभा केला होता. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संचालक म्हणून काम केलेल्या काही माजी संचालकांना भाजपच्या पॅनेलने उमेदवारी बहाल केली होती.

Amit Shah on reservation
बहुमत मिळाले तर आरक्षण रद्द होणार का? राहुल गांधींच्या टीकेला अमित शाहांचे उत्तर, आंबेडकरांचा केला उल्लेख
In front of BJP candidate Navneet Rana Congress workers shouted slogans like Vare Panja Aya Panja
जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…
Devendra Fadnavis
“काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
lok sabha elections 2024 vanchit bahujan aghadi chief prakash ambedkar exit from alliance with maha vikas aghadi
नागपूर, कोल्हापूरसाठी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधातच अकोल्यात उमेदवार