दक्षिण आफ्रिकेतील नागरिक मेफ्रेडॉन हा घातक पदार्थ भारतात आणत असल्याने त्यांच्यावर मुंबईत पाळत ठेवली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सभागृहाला दिली.
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी लावणारी टोळी सक्रिय आहे. या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, मेफ्रेडॉन हा घातक पदार्थ गोळी आणि भुकटीच्या स्वरूपात मिळतो. हा पदार्थ ‘बुक’, ‘एमडी पावडर’ या सांकेतिक नावांनी ओळखला जातो. तो कोकेनपेक्षा स्वस्त असून त्याच्या सेवनाचे प्रमाण वाढले असल्याचे उत्तरात स्पष्ट करण्यात आले.