इयत्ता पहिली ते दहावी व बारावी इयत्तामध्ये शैक्षणिक वर्ष  सन २०१६-१७ मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी सनिक/युद्ध विधवा/माजी सनिक विधवा यांच्या दोन पाल्यांकरिता केंद्रीय सनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून प्रति पाल्यास प्रति वर्ष १२००० रुपयांची आíथक मदत मंजूर केली जाते. इच्छुक लाभार्थीनी केंद्रीय सनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचे वेबसाइट  ६६६.‘२ु.ॠ५.्रल्ल यावर ऑनलाइन अर्ज दाखल करावयाचे आहेत. हे अर्ज ऑनलाइन सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१६ आहे. तसेच (इयत्ता अकरावीमध्ये ) (मुला-मुलींसाठी) व पदवीचे पहिले वर्ष व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्त (फक्त मुलींसाठी ) सन २०१६-१७ मध्ये  शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज खालीलप्रमाणे सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे फोन नंबर ०२३६२-२२८८२० वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट घ्यावी.

या बाबींसाठी खाली नमूद केलेली कागदपत्रे घेऊन संगणक सुविधा केंद्र (सायबर कॅफे) मध्ये जाऊन वरील संकेतस्थळावर जाऊन आपले प्रकरण सादर करावे. सादर केलेल्या प्रकरणांच्या मूळ प्रती व अर्ज या कार्यालयात त्वरित जमा करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा सनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग, मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे, पाल्याचा पासपोर्ट साइज फोटो, डिस्चार्ज पुस्तकाची पूर्ण झेरॉक्स व मुलांची पार्ट टू ऑर्डरची झेरॉक्स, पाल्याचे मागील वर्षी पास झालेले मार्कशिट, एस. बी. आय./ पंजाब नॅशनल बँकेच्या खातेपुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कारउ कोडसहित, माजी सनिक/विधवेच्या ओळखपत्राची झेरॉक्स, माजी सनिकाने स्वत: इंग्रजी भाषेमध्ये प्रमाणपत्र देणे, त्यांनी पाल्यासाठी शासनाकडून किंवा जिल्हा सनिक कार्यालयाकडून किंवा जेथे नोकरीस आहे त्याच्याकडून कोणतीही आíथक मदत घेतलेली नाही. ऑनलाइन अर्ज करताना माजी सनिकाने स्वत:चा आधारकार्ड नंबर व अर्जासोबत आधारकार्डची झेरॉक्स प्रत,  ई-मेल आयडी व मोबाइल नंबर (स्वत:चा नमूद करणे जरुरी आहे.) तसेच वरील नमूद कागदपत्रे नेटवरती ऑनलाइन  स्कॅन करून अपलोड केल्यानंतर सादर करायची आहेत.