अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने अजूनपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अपंगांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.  अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रायगड जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन व सर्व अपंग संस्था संघटनांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष साईनाथ पवार यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्य़ातील अपंगांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अपंग कल्याण कक्षासाठी पूर्वीप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या तळ मजल्यावर प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने अपंगांना त्यांच्या कार्यालयात पोहचताना नाहक त्रास होतो. आठवडय़ातील प्रत्येक बुधवारी या सर्व अधिकाऱ्यांना तळमजल्यावर बसण्याची व्यवस्था करावी, जिल्ह्य़ातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या स्वउत्पन्नातील तीन टक्के निधी महिन्याच्या आत खर्च करण्याबाबत प्रशासनाने आदेश द्यावे, प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी वाढीव लक्षांक द्यावा, दिव्यांग बांधवांना  देण्यात येणारे मानधन एक हजार पाचशे रुपये करण्यात यावे, मानधनाकरिता २१ हजार रुपयांच्या उत्पन्नाची अट शिथील करण्यात यावी, एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक दिव्यांगांना सम प्रमाणात मानधन वितरीत करावे, दिव्यांग कायद्याची अंमबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तेरा विधिमंडळ, सदस्यांची समिती गठीत  करावी, दिव्यांगांना कर्जमाफी देऊन वित्त महामंडळाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, गुणवत्ताधारक  दिव्यांग खेळाडूंना शासन निर्णयानुसार, तातडीचे शासकीय सेवेत सामावून घेणे अशा अनेक मागण्या शासन दरबारी करण्यात आल्या. वेळोवेळी मोच्रे, आंदोलने करण्यात आले. शांततेच्या मार्गाने निवेदनेही देण्यात आले. मात्र  शासननाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  शुक्रवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने आंदोलन पुकारले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्य़ातील  अपंग  मोठय़ा संख्येने सहभागी झाले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला असून  हे आंदोलन  मागण्या पूर्ण होईपर्यंत राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बी. जी. पाटील, विष्णू धाक्रस आदी पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते.

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता