रतिकांत पाटील यांच्यावही हल्ला

कर्नाटकातील माजी आमदार रवि पाटील यांना मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्या पुतणे व भावजयांसह २५ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्यांचे सख्खे बंधू असलेले शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांच्यावही हल्ला झाला. रेल्वे लाइन्स भागातील रविशंकर बंगल्यात हा प्रकार घडला.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

रवि पाटील (५८) हे २५ वर्षांपूर्वी सोलापूरच्या गुन्हेगारी जगतातील ‘डॉन’ समजले जात. टोळीयुद्धात रवि पाटील यांची टोळी सक्रिय होती. खून, बलात्कार, खंडणी आदी गंभीर गुन्हे नावावर असलेल्या व तत्कालीन ‘टाडा’ची कारवाई झालेल्या रवि पाटील यांना एका बलात्काराच्या खटल्यात सात वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ते सुटले होते. तत्पूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला व ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर शेजारच्या कर्नाटकातील विजापूरमध्ये इंडीतून त्यांनी सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्याच वेळी इकडे दक्षिण सोलापुरातून सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आपले पुतणे उदय पाटील यांना उभे केले होते. नंतर आपले बंधू रतिकांत पाटील यांना शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आणले होते. २००८ साली सात रस्त्यावरील आपल्या बंगल्यात स्वत:चा वाढदिवस साजरा करताना मध्यरात्री फटाके फोडून ध्वनिप्रदूषण संरक्षण कायद्याचा भंग केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांनी रवि पाटील यांना बळाचा वापर करीत चांगलाच हिसका दाखवला होता. आमदार असताना रवि पाटील यांना पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीचे प्रकरण व त्याविरोधात शिवसेनेसह २५ आमदारांनी पोलीस आयुक्त कामटे यांच्या विरोधात काढलेला मोर्चा, यामुळे हे संपूर्ण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते.

अशी गुन्हेगारी व नंतर राजकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या रवि पाटील यांच्याशी त्यांचे पुतणे उदय पाटील यांनी पंगा घेतला. रवि पाटील टोळीचे मूळ सूत्रधार राहिलेले दिवंगत रमेश पाटील यांचे उदय पाटील हे पुत्र आहेत. दोघा काका-पुतण्यांमध्ये वैमनस्य निर्माण होऊन ते वाढतच गेले आहे. त्यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून नेहमीच हाणामाऱ्या होऊन पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. याच कारणातून रेल्वे लाइन्स येथील रविशंकर बंगल्यात रवि पाटील यांना पुतणे उदय पाटील, रोहित पाटील, सून अंबिका उदय पाटील, भावजय रोहिणी रमेश पाटील यांच्यासह सुमारे २५ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली.

या वेळी रवि पाटील यांना वाचविण्यासाठी धावून आलेले त्यांचे बंधू माजी आमदार रतिकांत पाटील यांनाही मारहाण झाली. त्यांच्या अंगावरील २० तोळे सोन्याचे दागिनेही बळजबरीने हिसकावून लुटण्यात आल्याचे स्वत: रवि पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.