मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
प्रसिद्ध म्युरल्स डिझायनर भारत रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत प्रथमच त्रिमितीय शिल्प (म्युरल्स) निर्मितीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले आहे. या शिबिरात 'थ्रीडी सिरॅमिक, थ्रीडी ग्लास, थ्रीडी मल्टिलेयर, थ्रीडी मिक्स मीडिया फर्निचर' अशा वेगवेगळ्या म्युरल्सच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याबाबतची माहिती शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नंदिनी अहिरराव यांनी दिली. कॉलेजरोडवरील अहिरराव कॉर्नरवरील कमल येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीत हे दहादिवसीय शिबीर होईल. या शिबिरासाठी शिक्षणाची अट नसून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकते. विशेष म्हणजे, चित्रकलेची पाश्र्वभूमी नसलेल्या व्यक्तींनाही या निर्मितीचा सहजपणे आनंद घेता येतो. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक व युवतींना घरबसल्या रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते. घर व कार्यालय सजविण्याच्या कामात वास्तुविशारद म्युरल्सचा प्रामुख्याने उपयोग करतात. स्थानिक पातळीवर त्यांना मुरल्सनिर्मिती करणारे पर्याय अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध असतात. म्हणजे, या माध्यमातून स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध असल्याचे रावल व अहिरराव यांनी नमूद केले. थ्रीडी म्युरल्स या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी रावल हे गेल्या ३५ वर्षांपासून म्युरल डिझायनिंग या विषयावर संशोधन करीत आहे. त्यांनी आतापर्यंत देशात ७५हून अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली असून या माध्यमातून तब्बल आठ ते नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. नाशिक येथे प्रथमच हे शिबीर होत असून त्याचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संदर्भात नावनोंदणीसाठी ९२२५७२२२२७, ९८६०७११११७ या क्रमांकांवर तसेच www.bharatrawal या संकेतस्थळावरही संपर्क साधता येईल.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















