जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले जवान उत्तम बाळू भिकले यांच्या पाíथवावर हडलगे, ता. गडिहग्लज या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील हजारो शोकाकुल ग्रामस्थांच्या उपस्थितीत अमर रहे, अमर रहे, उत्तम भिकले अमर रहे, अशा घोषणा देत हडलगेच्या ग्रामस्थांनी या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी लष्कर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद जवान उत्तम भिकले यांच्या पाíथवास सलामी देण्यात आली.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री भरमू पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक इब्राहिम मकानदार, १०९ टी ए बटालियनचे कर्नल जे रॉक, कर्नल कमांडिंग ऑफिसर जे. डी गुप्ता, सुभेदार मेजर दशरथ भिकले, सेकेंड मराठा लाइट इन्फंट्रीचे कर्नल विजय पिसे, गडहिंग्लज प्रांत अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक, गडहिंग्लज तहसीलदार हनुमंत पाटील, गडहिंग्लज पोलीस उप अधीक्षक अशोक भरते, सरपंच कमल नाईक, उपसरपंच अनिल पाटील, आदींसह कमांडंट मराठा लाइट इन्फंट्री बेळगाव, व्हाईट आर्मीच्या वतीने उत्तम भिकले यांच्या पाíथवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
सेकेंड मराठा लाइट इन्फंट्रीचे शहीद जवान उत्तम भिकले यांचे पाíथव दि. १९ मे २०१४ रोजी रात्री ८ वाजता खास विमानाने दिल्ली येथून पुणे येथे आणण्यात आले. तेथून आज दि. २० मे २०१४ रोजी पहाटे कोल्हापूर येथील १०९ टी ए बटालियनच्या कार्यालयात भिकले यांचे पाíथव आणण्यात आले. येथे १०९ टी ए बटालियनच्या वतीने भिकले यांच्या पाíथवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनाने उत्तम भिकले यांचे पाíथव हडलगे या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. जब तक सूरज चांद रहेगा उत्तम भिकले तेरा नाम रहेगा, वीर जवान तुझे सलाम या घोषणा देत अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत लष्कराचे अधिकारी, जवान, पोलीस, विविध शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर पाíथवाचे सगळय़ांना दर्शन घेता यावे याकरिता पाíथव मंचावर ठेवण्यात आले. या वेळी  शोकाकुल वातावरणात भिकले यांच्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी शहीद जवान उत्तम भिकले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्करी इतमामात पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, व्हाइट आर्मीचे जवान तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.