राज्यपाल सी. विद्यासागर राव हे धुळे जिल्ह्य़ातील बारीपाडा येथे २८ मे रोजी भेट देणार असून या भेटीनंतर ते धुळे येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीविषयी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक झाली. बैठकीस सर्व प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्य़ात पेसा कायद्याची अंमलबजावणी, आदिवासी भागातील वीज, पाणी पुरवठय़ासह पोषण आहाराची स्थिती, वन हक्क कायदा, स्वच्छता यांचीही माहिती राज्यपाल घेणार आहेत.