स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी झालेल्या चळवळीचे एकहाती तसेच निर्वविाद नेतृत्व ज्यांनी केले, त्या गोविंदभाई श्रॉफ यांची जयंती गेल्या आठवड्यात पार पडली. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून विकास चळवळ चालवताना भाईंनी सरस्वती भुवन शिक्षण संस्था नावारूपास आणण्यात, तिचा शैक्षणिक व भौतिक विकास करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्यावर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचे शीर्षक ‘निर्मोही’ (ले.डॉ.शिवाजी गऊळकर) असे आहे. भाईंच्या निधनाला आता १६ वष्रे उलटली असून त्यांच्या पश्चात सरस्वती भूवन शिक्षण संस्था चालवली जात असली, तरी तेथील ‘निर्मोही वृत्ती’ गेल्या दशकातच गळून पडली असून तेथे आता ‘मोहा’ची वृत्ती बहरली की काय, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.

हे सर्व लिहिण्यामागचे प्रयोजन म्हणजे गोविंदभाईंच्या जयंतीनिमित्त सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक-वैचारिक उपक्रम-कार्यक्रम समाजाला अपेक्षित होता; पण त्याऐवजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीभ्रमणाचा कार्यक्रम आयोजित करुन भाईंच्या असंख्य चाहत्यांना चकित केले. अलीकडच्या काळातील काही तरुण सभासद वगळता सरस्वती भुवनचे बहुसंख्य सभासद वयाची साठी पार केलेले. त्यांच्यासाठी गिरीभ्रमणाचा उपक्रम आयोजित करुन संस्थेच्या विद्यमान सरचिटणीसांनी हसे तर करुन घेतलेच;पण भाईंच्या जयंतीच्यानिमित्ताने संस्थेत मागील काही महिन्यांपासून चाललेल्या घटना-घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Ichalkaranji
कोल्हापूर : इचलकरंजी पाणी योजनेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, निर्णयावर टीका आणि स्वागत
Village to JNPT Rajendra Salves successful journey
वर्धानपनदिन विशेष : गाव ते जेएनपीटी… राजेंद्र साळवेंचा यशस्वी प्रवास
32 representatives of cooperative societies from Kolhapur district were honored with flight to Delhi
कोल्हापुर जिल्ह्यातील ३२ सहकारी संस्था प्रतिनिधींना दिल्ली हवाई यात्रेचा मान
vehicle caught fire
कोल्हापूर : आग लागून मोटार बेचिराख; इचलकरंजी जवळील प्रकार

सरस्वती भुवन म्हणजे औरंगाबादेतली नव्हे तर मराठवाड्यातील एक नामांकित संस्था. तिचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. दोन वर्षांपूर्वी संस्थेने शताब्दी पर्व साजरे केले. अनेक दिग्गजांनी संस्थेचे नेतृत्व केले;पण आज ही संस्था प्रामुख्याने गोविंदभाईंच्या नावाने ओळखली जाते. १९६५ ते २००२ असा आपल्या आयुष्यातील तब्बल ३७ वर्षांचा कालखंड त्यांनी या संस्थेसाठी दिला. त्यांच्या पश्चात त्यांचे काही अनुयायी काही व्यावसायिक आणि काही ‘परिवार’जन आज संस्थेचे कारभारी झाले आहेत. त्यावर कोणाचा आक्षेप नाही पण भाईंनी रुजवलेली मूल्ये गिरीभ्रमणासारख्या मोहिमांतून औरंगाबादलगतच्या डोंगरदऱ्या गाडण्यात येत आहेत की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

अलीकडच्या काळात ही संस्था अनियमितता, बेकायदेशीर निर्णय, डोनेशन संस्कृती वाढविणारी इंग्रजी शाळा, एका ज्येष्ठ सभासदाचे निलंबन, त्यावरून आरोप-प्रत्यारोप आणि घटनादुरुस्ती अशा वेगवेगळ्या विषयांवरुन माध्यमे तसेच समाज माध्यमांमधून चच्रेत असून ‘लोकसत्ता’ ने मागील दीड-दोन महिन्यात केलेल्या वार्ताकनातून ‘स.भु.’ तील एकंदर परिस्थिती समोर आल्यानंतर गोविंदभाईंच्या चाहत्यांपकी काही जण व्यथीत झाले, काही जण अस्वस्थ तर काही जण चिंतातूर झाल्याचे दिसून येते.

गोविंदभाईंनी निर्माण केलेल्या संस्था-संघटनांमधला सुसंवाद हरपला असून प्रत्येक ठिकाणी संस्थेवर आपले व आपल्या कंपुचे वर्चस्व कसे कायम राखता येईल, ही प्रवृत्ती फोफावत आहे. स.भु.मध्ये अलीकडे काही नवे सभासद करण्यात आले त्यानंतर वरील बाब प्रकर्षांने समोर आली. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेतही सारे काही आलबेल नाही आणि जनता विकास परिषद नेमके काय करत आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. या संस्था भाईंसाठी जीव की प्राण होत्या. त्यांच्या पश्चात चाललेल्या कारभारावर चांगली प्रतिक्रिया खचितच नाही.

स.भु.प्रशाला आणि महाविद्यालयांतून आजवर लाखो विद्यार्थी बाहेर पडले. त्यांच्यातील काही जण संस्थेशी जोडले गेले आहेत. व्यक्तीगतरित्या ही त्यांच्यापुरती समाधानाची, मिरवण्याची बाब पण माजी विद्यार्थ्यांपकी सारंग टाकळकर यांनी भाईंच्या जयंतीचे औचित्य साधत, स.भु.च्या संबंधाने प्रसृत केलेली भावना प्रातिनिधिक मानता येईल. भाईंना उद्देशून लिहिलेल्या पत्रातून त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.

टाकळकर म्हणतात, शताब्दी पर्वात ही संस्था फुलली आहे, पण त्याऐवजी फोफावली असे म्हणावेसे वाटते. भाईंनी प्रयत्नपूर्वक जपलेली संस्थेची प्रतिष्ठा लयास गेली आहे. एका छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला;पण काही अपवाद वगळता त्या वृक्षाला बांडगुळांनी वेढले आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील अलीकडच्या काळातील काही घटना-घडामोडींचा थेट उल्लेख न करता टाकळकर यांनी म्हटले आहे की, गोविंदभाईंची साधेपणाची शिकवण येथे विसरल्यात जमा आहे. एकमेकांना दुषणे देत कुरघोडीच्या चालींमुळे संस्थेची लख्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार घडतोय. भाईंच्या मुल्यांना हरताळ फासत बाजारुवृत्ती बोकाळल्या आहेत. याचा दाखला देताना टाकळकर यांनी संस्थेने सुरु केलेल्या शाळेकडे लक्ष वेधले. डोनेशनचा फंडा आणि धंदा सुरु करण्यासाठी हे नवे शोरुम या बाजारात सुरु झाले, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोविंदभाईंनी त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या घटनेत विद्या समिती व संशोधन प्रतिष्ठान या दोन बाबींचा अंतर्भाव केला होता. प्रा.विजय दिवाण यांनी ‘संतभूमीचा योद्धा-गोविंदभाई श्रॉफ’ या चरित्रात्मक पुस्तकात या दोन्ही बाबींचा खास उल्लेख करून गोविंदभाईंच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकला. पण गोविंदभाईंची ही कलमे घटनेतून वगळण्याचा घाट घातला जात आहे. शताब्दी काळात संस्थेच्या वाटचालीचा रस्ता हा महामार्ग बनणे अपेक्षीत असताना सध्याची वाटचाल चढण-घाटाचीच आहे आणि संस्थेला कलम करणेच सुरु आहे.

संस्थेची वाटचाल गोविंदभाई श्रॉफ यांनी आखून दिलेल्या मार्गानेच सुरू आहे. आधीच्या कार्यकारी मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या प्रथा पाडल्या होत्या. त्या आम्ही थांबविल्या आहेत. संस्थेचा कारभार घटनेनुसार पारदर्शक पद्धतीने चालावा यावर आमचा भर असतो. संस्थेने नव्याने सुरू केलेल्या ‘सीबीएसी’ अभ्यासक्रमाच्या इंग्रजी शाळेबद्दल मतभिन्नता असू शकते.प् पण काळाची पाऊले ओळखून संस्थेने हे पाऊल टाकले आहे. संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसारच नवे सभासद करण्यात आले आहेत. घटना दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संस्थेच निश्चितच बदल बघायला मिळतील.  जुगलकिशोर धूत, सहचिटणीस