गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-कोकण मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी बंदीचा निर्णय निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात १६ टनांपेक्षा अधिक अवजड वाहनांना मुंबईहून गोव्याला जाण्याचा मार्ग बदलावा लागणार आहे. १ सप्टेंबर पासून  ५ सप्टेंबर पर्यंत गोवा-मुंबई मार्ग अवजड वाहनांसाठी ठराविक वेळेत बंद असणार आहे.  रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेत अवजड वाहनांना या मार्गावरुन प्रवेश दिला जाणार नाही. परिणामी अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागेल. जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. कोकणातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका पर्यायी मार्गावर बसू शकतो. कोकणमार्गावरील वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णयामुळे अवजड वाहनांना उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.