राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. मधुकर पिचड यांचे महादेव कोळी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र खंडपीठाने रद्द केले आहे. त्यांना कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना खंडपीठाने दिल्या आहेत. त्यामुळे महादेव कोळी जात दाखवून अनुसूचित जमाती अंतर्गत घेत असलेले त्यांचे आरक्षण रद्द झाले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने मधुकर पिचड यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
पिचड यांच्या अनुसूचित जमात प्रमाणपत्रामुळे आदिवासी समाजाचे नुकसान झाल्याचा दावा राज्य आदिवासी मन्न जमात मंडळाने याचिकेत केला होता. खंडपीठाच्या निर्णयामुळे पिचडांना आता कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र घेऊन त्यानुसार मिळणारे फायदेच त्यांना मिळवता येतील. पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते, असे आदिवासाी मन्ना जमातीने म्हटले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या निर्णयामुळे त्यांना ‘एसटी’ आरक्षणांतंर्गत मिळणारे फायदे मिळणार नाहीत. मधुकर पिचड यांनी संगमनेर येथून महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते.

Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”