सातारा येथील अदालतवाडा नजीक असणाऱ्या ओढय़ात सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची मुघलकालीन सोने आणि चांदीची नाणी सापडली. याची बाजारभावानुसार किंमत दहा लाख पंधरा हजार रुपये इतकी आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दाभाडे यांना काही इसमांकडून सातारा शहरातील काही जणांना सोन्या-चांदीची नाणी मिळाल्याचे समजले. दाभाडे तसेच प्रतिबंधक कारवाई पथकाचे सुहास पवार, राकेश देवकर, विशाल मोरे यांनी आरोपी प्रकाश भिसे व लहू मोरे यांना ताब्यात घेतले आहे. हा तपास सुरू असताना त्यांच्याकडून एक तांब्याचे जुने फुटके भांडे जप्त केले. त्यात चांदीची ८५ व सोन्याची २ नाणी सापडली. तसेच एक सोन्याची लगडही हस्तगत करण्यात आल्याचे सांगितले. लगडीची किंमत अंदाजे ७५ हजार इतकी आहे.