भारत आणि पाकिस्तानमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण झाली पाहिजे हा मुद्दा योग्य असला, तरी किती भारतीय कलाकार पाकिस्तानात जाऊन कार्यक्रम करू शकतात, असा प्रश्न ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये उपस्थित केला.
गुलाम अलींच्या कार्यक्रमांना शिवसेनेकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, पाकिस्तानी कलाकारांचे अनेक कार्यक्रम भारतात होता. पण आपले लोक तिथे जाऊन कार्यक्रम करू शकतात का? सांस्कृतिक देवाण घेवाण झाली पाहिजे हा मुद्दा योग्य असला तरी त्याचा दोन्ही बाजूंनी विचार केला गेला पाहिजे.
भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकार अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगून त्यांनी पुरस्कार वापसीला स्पष्ट शब्दांत विरोध केला. देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे आपल्याला अजिबात वाटत नाही, असेही म्हटले आहे.