बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्य़ांचा निकाल ९०.९८ टक्के लागला. बीड जिल्ह्य़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक ९२.३६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींचीच उत्तीर्णतेत आघाडी आहे. मुलांच्या तुलनेत ४.१४ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या.
विभागात ८ हजार १९१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले, तर प्रथम श्रेणीत ५३ हजार ७३५ विद्यार्थी असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्य़ात ४१ हजार १७३ विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेसाठी बसले होते. पैकी ३७ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.२४ टक्के आहे. विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी कला आणि वाणिज्य शाखेच्या तुलनेत अधिक आहे. ९४.४४ टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले, तर कला शाखेचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०६ आहे. सन २०११मध्ये औरंगाबाद जिल्ह्य़ाचा निकाल ५०.७६ टक्के होता. गेल्या ४ वर्षांपासून त्यात वाढ होत आहे. २०१२मध्ये ६०.७१ टक्के, २०१३मध्ये ८३.९७ टक्के व या वर्षी ९१.२४ टक्के असा चढता आलेख आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ४०० रुपये शुल्क विभागीय कार्यालयात रोखीने अथवा धनाकर्षांने भरल्यास ती मिळू शकेल. २ ते २१ जूनपर्यंत तसे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जालन्याचा निकाल ८९.८७ टक्के
जालना जिल्ह्य़ात १५ हजार ३१५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. पैकी १३ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.८७ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली. २०११ मध्ये जालन्याचा निकाल ४२.२१ टक्के होता. ही टक्केवारी आता ८९.८७ टक्के झाली. विशेष म्हणजे कॉपीमुक्ती अभियानानंतर निकालात झालेली ही वाढ लक्षणीय मानली जाते.
हिंगोलीचा निकाल ९०.७१ टक्के
वार्ताहर, हिंगोली
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ८ हजार ४२१ पकी ७ हजार ६३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुमारे ७८ टक्के विद्यार्थी गुणवत्तायादी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९३.७३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.३५ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.३० टक्के, कला शाखा ८९.७७ टक्के असा निकाल आहे. कला, वाणिज्य शाखेचे सर्वाधिक ४ हजार ६३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पकी ४ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेच्या २ हजार ८०६ पकी १ हजार ७९२, वाणिज्य शाखेत ६६२ पकी ६१८, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ३१९ पकी २९९ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
िहगोली तालुक्यात १ हजार ५३७ विद्यार्थी व ७६६ विद्यार्थिनी असे २ हजार ३०३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यात ९०.२४ टक्के, म्हणजे १ हजार ३८७ विद्यार्थी, तर ७१० (९२.७९) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. कळमनुरीत १ हजार १५८ विद्यार्थी, तर ६३७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. पकी १ हजार ३० विद्यार्थी (८८.९५) व ५९५ विद्यार्थिनी (९४.१५) उत्तीर्ण झाल्या. वसमत येथे १ हजार ६४९पैकी १ हजार ४६६ (८८.९०) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १ हजार ६७ विद्यार्थिनींपकी १ हजार ७ (९४.३८) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सेनगावात ६८८ पकी ६०२ (८७.५०) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २९२ विद्यार्थिनींपकी २६० (८९.०४) विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. औंढा नागनाथ येथे ३९८ पकी ३५७ (८९.७०) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २३४ पकी २२५ (९६.१५) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
परभणीला निकालात मुलांपेक्षा मुलीच पुढे  
वार्ताहर, परभणी
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८९.१२ टक्के निकाल लागला. या वर्षीही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात ९२.३७ टक्के मुली, तर ८७.३५ टक्के मुले उत्तीर्ण झाले. दि. १० जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २.२० टक्के निकाल वाढला.
जिल्ह्यात २२० उच्च माध्यमिक शाळा आहेत. पकी २६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. संत ज्ञानेश्वर माध्यमिक शाळा (परभणी), ऑक्सफोर्ड कनिष्ठ महाविद्यालय (चुडावा) या दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. ७८ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
जिल्ह्यातून १७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली. पकी १७ हजार २१३ विद्यार्थी परीक्षेस बसले. १५ हजार ३४० विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. १ हजार ४२७ विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह, प्रथम श्रेणीमध्ये ७ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८६.९२ टक्के लागला होता. या वर्षी निकाल २.२० टक्क्यांनी वाढला.
औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्य़ाची मुसंडी
वार्ताहर, बीड
बारावीच्या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. बीड जिल्हय़ाचा निकाल ९२.३६ टक्के लागला. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.०४ टक्के, तर मुलांचे ९१.४० टक्के आहे. औरंगाबाद विभागात बीडचा सर्वाधिक ९२.३६ टक्के निकाल आहे.
जिल्हय़ात २९ हजार २७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १८ हजार ७१९ मुले व १० हजार ५५८ मुलींचा समावेश होता. जिल्हय़ातील ११ तालुक्यांमध्ये बीड ९४.१९, गेवराई ९४.१८, आष्टी ९२.७९, माजलगांव ८९.६५, अंबाजोगाई ८९.७९, केज ९३.७४, परळी ८७.८४, धारुर ८६.७३, शिरूर ९१.१४ व वडवणी ९४.१४ या प्रमाणे निकाल जाहीर झाला. जिल्हय़ात सर्वाधिक निकाल गेवराई व वडवणी तालुक्यांचा, तर सर्वात कमी धारूर तालुक्याचा आहे.
जिल्हय़ाच्या निकालाचा टक्का यंदा वाढला. १४ महाविद्यालयांनी शंभरपकी शंभर गुण मिळवले. यात बोरखेड हायस्कूल (बोरखेड), बहादुरशहा जफर उर्दू महाविद्यालय (नेकनूर), नगद नारायण उच्च माध्यमिक विद्यालय (नारायणगड), सनिकी उच्च माध्यमिक विद्यालय (बीड), वडगाव उच्च माध्यमिक विद्यालय (वडगाव गुंदा), कला उच्च माध्यमिक विद्यालय (िपपळनेर), रामचंद्र निवृत्ती धस उच्च माध्यमिक विद्यालय (मुगगाव), संत भगवानबाबा उच्च माध्यमिक विद्यालय (बावी), उच्च माध्यमिक विद्यालय (उमापूर), मालणबाई देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय (सिरसाळा), यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय (पोहनेर), आर्वी उच्च माध्यमिक विद्यालय (आर्वी), महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय (शिरूर) व हुतात्मा देवराव उच्च माध्यमिक विद्यालय (िपपळनेर, शिरूर)  या महाविद्यालयांचा समावेश आहे.
बारावी परीक्षेत लातूरच्या निकालाचा टक्का वधारला
वार्ताहर, लातूर
बारावीच्या परीक्षेत लातूरच्या निकालाचा टक्का चांगलाच वधारला. लातूर विभागाचा निकाल ९०.६० टक्के असून, लातूर जिल्हय़ाचा ९१.६३, तर नांदेडचा ९०.४१ व उस्मानाबादचा निकाल ८८.७५ टक्के आहे.
वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा लागू केल्यानंतर बारावीला किमान ५० टक्के गुण अपेक्षित होते. या गुणांची नोंद अन्य उच्चशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतली जात नव्हती. या वर्षीपासून बारावीचे गुणही विचारात घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेवरही लक्ष केंद्रित केले. त्यामुळे गुणांचा टक्का चांगलाच वधारला, अशी माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष एन. एच. मुल्ला व सचिव सचिन जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली.
लातूर विभागातील ५७७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ६६ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी १९० केंद्रांतून परीक्षा दिली. ६० हजार ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० हजार १०९ विद्यार्थी परीक्षेस बसले. पकी ३५ हजार ४७८ उत्तीर्ण झाले. २६ हजार ८८७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली, पकी २५ हजार २१८ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.४५, तर मुलींचे ९३.७९ टक्के आहे. २०१०मध्ये राज्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी लातूर परीक्षा मंडळात झाली. परिणामी, लातूरचा निकाल ४७.५९ असा कमी लागला. २०११मध्ये ५६.५७, २०१२मध्ये ७५.४६, २०१३मध्ये ८३.५४, तर २०१४मध्ये ९०.६० टक्के निकाल लागला.
विभागात शिक्षण क्षेत्रातील सर्वच मंडळी कॉपीमुक्त अभियानाकडे गांभीर्याने पाहात असून, कॉपीविना शैक्षणिक वाटचाल करण्यावर भर दिला जात असल्याचा दावाही मुल्ला व जगताप यांनी केला.
निराशेची परंपरा मागे टाकून बारावीत रोवला यशाचा झेंडा
वार्ताहर, उस्मानाबाद
बारावीच्या परीक्षेत जिल्हय़ात मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ८८.७५ लागला. उत्तीर्ण होण्याची सरासरी मुलींची ९२.९८ टक्के, तर मुलांची ८५.९५ आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८३.२२ टक्के लागला होता. मागील वर्षीच्या निराशाजनक परंपरेला धक्का देत जिल्ह्याचा यंदाचा निकाल समाधानकारक राहिला. लातूर विभागाचा निकाल यंदा वाढला असून उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
गतवर्षी लातूर जिल्ह्याचा निकाल ८५.४२ टक्के होता. यंदा नेहमीप्रमाणे विभागात पहिला क्रमांक पटकावत लातूरचा ९१.६३ टक्के निकाल लागला. नांदेड जिल्ह्याचा गतवर्षी निकाल ८१.३९ टक्के होता. यंदा या जिल्ह्यानेही निकालात आघाडी घेतली. नांदेडचा निकाल ९०.४१ टक्के लागला. उस्मानाबाद जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत काहीअंशी वाढ झाली. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८३.२२ टक्के होता. या वर्षी तो ८८.७५ टक्के लागला.
जिल्ह्यातून या वर्षी १३ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पकी १३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १२ हजार ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या ५ हजार ३३५ तर मुलांची ६ हजार ७५० आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.९८, तर मुलांचे ८५.९५ टक्के आहे.
१३ शाळांचा १०० टक्के निकाल
जिल्ह्यातील १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यात स्नेहलता देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय (ढोकी), रूपामाता उच्च माध्यमिक विद्यालय (पाडोळी), ज्ञानवर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय (केशेगाव), महात्मा फुले कला उच्च माध्यमिक विद्यालय (कोंड), राजर्षी शाहू उच्च माध्यमिक विद्यालय (नितळी), जि.प. उच्च माध्यमिक विद्यालय (वाघोली), आसरा उर्दू ज्युनिअर कॉलेज (उस्मानाबाद), जि.प. उच्च माध्यमिक विद्यालय (दहीफळ), सुफिया उच्च माध्यमिक विद्यालय (कळंब), श्री बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय (जेवळी), वसंतराव शंकरराव काळे उच्च माध्यमिक विद्यालय (परंडा), एस. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (परंडा) आणि शिवाजी कॉलेज (परंडा) या विद्यालयांचा समावेश आहे.