स्वतः जवळील बंदुकीची गोळी सुटून सैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कारंजा लाडमधील दिल्ली वेश परिसरातील मोचीपुरा येथील सैनिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळून आले. योगेश प्रभुदास इंगळे ( ३२) असे या मृत पावलेल्या सैनिकाचे नाव असून, तो महार बटालियन,सागर येथे सेवेत कार्यरत होता.दरम्यान 16 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यन्त योगेश रजेवर आला होता. योगेशने  गोळी झाडून आत्महत्या केली की चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला हे  अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बाबत कारंजा शहर पोलीस घटनेचा तपास करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीउशिरापर्यंत सुरु होती.