आपले संपूर्ण जीवन समाजहितासाठी समर्पित करणारे सामाजिक कार्यकत्रे व तंत्रज्ञ जयंत वैद्य गुरुजी यांच्या निधनामुळे ज्ञानसत्तेतील माणूस हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ५० वर्षांपूर्वी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर वैद्य लातूरला आले. मोटार रिवायंिडगचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायात लातूरचे किमान ४०० तरुण आहेत. स्वतच्या मुलाप्रमाणे गुरुजींनी या सर्वाना हवे नको ते पाहिले व प्रसंगी स्वतची संपत्ती गहाण ठेवून मदत केली. शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा, मराठवाडा विकासासाठी जनता विकास परिषदेमार्फत प्रयत्न, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा, दूधउत्पादन आदींवर चिंतन केले. समाजवादी विचारसरणीचे ते खंदे कार्यकत्रे होते, अशा भावना व्यक्त करण्यात आला.
अॅड. मनोहरराव गोमारे यांनी राजकारण स्वतसाठी न करता सामान्यांसाठी केले पाहिजे, हा विचार त्यांनी राजकारण्यांना दिला, असे सांगितले. समाजासाठी दीपस्तंभ असणाऱ्या गुरुजींनी अनेक यशस्वी सामाजिक प्रयोग केले. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सलाम, या शब्दांत माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी, तर गुरुजींचे संपूर्ण जीवन शुद्ध विचारांचे होते. त्यांचे जगणे हेच मार्गदर्शक तत्त्व होते, अशा भावना डॉ. गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
माजी मंत्री अमित देशमुख यांनी वैद्य व देशमुख कुटुंबीयांचा स्नेह तीन पिढय़ांपासून असल्याचे सांगितले. माजी आमदार वैजनाथ िशदे, लक्ष्मीरमण लाहोटी, सुमतीताई जगताप, शरद कारखानीस, प्रा. श्याम आगळे, प्रा. हरीष देशपांडे, अशोक गोिवदपूरकर, आशाताई भिसे, अॅड. विक्रम हिप्परकर, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अतुल देऊळगावकर यांनी सूत्रसंचालन, सूर्यकांत वैद्य, संजय अयाचित यांनी सभेचे आयोजन केले.