बेळगाव पोलिसांनी शनिवारी कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांचा येळ्ळूर गावात शिरण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव पोलिसांकडून येळ्ळूर गावाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बेळगावात तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा येळ्ळूरमध्ये अमानुष लाठीमाराची दखल घेत, राज्य सरकारच असे अत्याचार करणार असेल तर त्यापेक्षा दुसरी गंभीर बाब असू शकत नाही, अशा शब्दांत कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले होते.
येळ्ळूरमधील अमानुष मारहाण गंभीर- सर्वोच्च न्यायालय