धर्मादाय सहआयुक्तांचे आदेश
जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू लिंगावर आता फक्त त्रिकाल पूजा करण्याचे आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त एस. जी. डिगे यांनी मरतड देवस्थानला दिले आहेत. इतर पूजा आणि अभिषेक गडकोटातील पंचिलग महादेव मंदिरात केले जावेत, असेही त्यांनी या आदेशात नमूद केले आहे.
श्री मरतड देवसंस्थानच्या विश्वस्तांची मंदिरातील समस्या आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी गडकोटातील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वयंभू महादेवाच्या लिंगावर आणि श्री मरतड देवाच्या पायावर काही ठराविक वेळेव्यतिरिक्त दिवसभरात जलाभिषेक आणि विविध पूजाअर्चा केल्या जातात. त्यामुळे गाभाऱ्यात सतत मोठी गर्दी राहते. स्वयंभू शिविलगावर सततचा जलाभिषेक आणि पूजा यामुळे शिविलगाची झीज होण्याचा संभव आहे. यामुळेच देवस्थानने गाभाऱ्यातील त्रिकाल पूजेव्यतिरिक्त इतरवेळी होणाऱ्या पूजा आणि अभिषेक पंचिलग महादेव मंदिरात कराव्यात, असे आदेश विश्वस्त मंडळाला दिले आहेत. त्यामुळे शिविलगाची झीज होणार नाही, तसेच गाभाऱ्यातील गर्दीही कमी होऊन भाविकांना देवदर्शन सुलभ होईल.
विश्वस्त मंडळाने यापुढे शनिवार, रविवार आणि यात्रा कालावधीत भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था गाभाऱ्याच्या बाहेरुन करावी, गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देऊ नयेत, असे निर्देशही देण्यात आले. मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात पहाटे पाच ते सहा, दुपारी साडेबारा ते दीड आणि रात्री नऊ ते दहा या वेळात स्वयंभू महादेवाच्या लिंगाची आणि मरतड देवाची पूजा करण्याचे आदेश दिले. या त्रिकाल पूजेच्यावेळी मानकरी, गावकरी आणि विश्वस्त मंडळाने किंवा व्यवस्थापकाने सुचविलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच गाभाऱ्यात जाण्याची परवानगी असून हक्कदारांतर्फे प्रत्येकी एक व्यक्तीच देवाच्या सेवेसाठी गाभाऱ्यात उपस्थित राहू शकणार आहे. तसेच आठवडय़ाचे मानकरी असतील त्यांच्यासमवेत केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जावा, असेही आदेश डिगे यांनी दिले आहेत.

horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक