विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व भारत अस्मिता फाऊंडेशन (पुणे) यांच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंतांना दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण सोहळय़ास भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार लालकृष्ण अडवाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्या (मंगळवारी) दुपारी १२.१५ वाजता वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी एमआयटीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेश कराड यांनी केले आहे.