मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मराठी साहित्यिकांमध्ये आणि त्यांच्या लेखनात लिहिण्याची प्रचंड ताकद असतानाही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखकांची संख्या कमी आहे. मराठी साहित्यिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यासाठी मर्यादा का येतात, याचा विचार मराठी साहित्यिकांसह साऱ्यांनीच केला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतरच्या भाषणात लेखक आणि कलावंतांनी जीवनसन्मुख व समाजाभिमुख व्हावे, असे सांगतानाच साहित्य क्षेत्रातील राजकारण्यांच्या प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादंगाबाबतही साहित्यिकांना चिमटे काढले.
चिपळूण येथे आयोजित ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना पवार म्हणाले, 'समाजात अवतीभोवती घडणाऱ्या विनाशकारी, विघातक घटकांकडे सोयीस्कर डोळेझाक
करून स्वत:च्या हस्तिदंती मनोऱ्यात राहणाऱ्या लेखक आणि कलावंतांनी आपली मुळे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी लेखक व कलावंताने जीवनसन्मुख व समाजाभिमुख असावे.'
चिपळूण संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे देण्यात आलेले नाव व अन्य वादाचा उल्लेख करून पवार यांनी सांगितले की, आमच्या क्षेत्रात साहित्यिक आले तर आम्ही त्यांना नावे ठेवत नाही. त्यांचे स्वागतच केले आहे. ठाकरे यांचे पत्रकारिता, साहित्याच्या क्षेत्रातील योगदान विसरू शकत नाही. त्यांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेबाबत विरोध असू शकतो.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापासून आजचे संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांच्यापर्यंत झालेले विविध संमेलनाध्यक्ष हे वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे होते. यात यु. म. पठाण, केशव मेश्राम, शंकरराव खरात यांचाही समावेश होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष व अन्य निर्थक वादात काही अर्थ नाही, असेही पवार ठामपणे म्हणाले.
महिलांच्या साहित्यातून सकस व दर्जेदार लेखनाविष्कार समोर आलेला असताना संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत चार लेखिकाच संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत. स्त्री-लेखकांनी लिहिलेल्या साहित्यावर मोकळेपणाने चर्चा झाली तर स्त्री-साहित्याचे सामथ्र्य आणि मर्यादा आपल्यासमोर येतील असेही पवार यांनी सांगितले.
ज्या लेखकाने साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे त्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद हे सन्मानाने मिळावे. त्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडीच्या पद्धतीचा फेरविचार करावा, असे आवाहनही पवार यांनी केले.
जगातील टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते. प्रस्थापित संस्कृतीतील कुरूपता अधोरेखित करण्याचे कार्य हे साहित्य करत असते. त्याचप्रमाणे जीवनाचे खरेखुरे सौंदर्य कुठे आहे आणि कसे आहे, हेही ध्वनित करत असते. अशा प्रकारे प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारेच साहित्य नव्या उन्नत जीवनाची स्वप्नेही पाहते.
- डॉ.नागनाथ कोत्तापल्ले , संमेलनाचे अध्यक्ष




















साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात सर्व वक्त्यानी भगवान परशुरामांचा / परशुराम भूमीचा उल्लेख करण सोयीस्करपणे टाळले. मा. शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या सवयीप्रमाणे सोयीस्कर बगल दिली.
हे लोकशाहीचे नव्हे तर दडपशाहीचे लक्षण मानावे लागेल.
मा.श्री.शरद पवार यांचे भाषण मुद्देसूद वाटते .मनाचे अवधान धरून ठेवते. अध्यक्षांचे भाषण वाचवत नाही. अतिशय वेदना होतात.त्यांनी शरद पवारांकडून बरेच शिकावे. एक समजत नाही शरद पवार संभाजी ब्रिग्गेडबद्दल काहीच बोलले नाही.परशुरामाच्या भुमित परशुरामाच्या पराभवा नंतर गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजाचे मोठेपण सुद्धा एक दिवस हे संभाजी ब्रिगेडवाले कमी करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.अखिल महाराष्ट्राला व भारताला पुनीत करणारे आळदीच्या कुलकर्णी या ब्राह्मण कुटुंबात निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी जन्म घेतला आहे. पुढिल वर्षापासून आळंदीहून निघणारी व पंढरपूरला जाणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा उधळून लावायचा अविचार करण्यास , ही ब्राह्मण द्वेष्टे उग्र मंडळी, मागे पुढे पाहणार नाहीत असे समजते. पंढरीराया विठ्ठला यांना सद्बुद्धि आणि सद्गती दे ही अनन्य आगतिक प्रार्थना.