जिल्हा परिषदेच्या राजूर गटाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कानकाटे यांना पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजय संपादन केला. अकोले तालुक्यात प्रथमच कमळ फुलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पिचड यांच्या राजूर या गावातही राष्ट्रवादीचा उमेदवार पिछाडीवर राहिला.
तालुक्यात आगामी काळातील परिवर्तनाची सुरुवात असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या विजयामुळे मनोधैर्य उंचावलेल्य युतीच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना बरोबर घेत आगामी दूध संघ साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे.
आमदार वैभव पिचड यांनी राजीनामा दिल्यामुळे राजूर गटाची पोटनिवडणूक झाली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्ञानेश्वर काकड यांच्या तिरंगी लढतीत डॉ. किरण लहामटे यांनी १ हजार २५३ मतांनी विजय संपादित केला. माकपचे काकड यांनी लक्षणीय मते घेऊन स्पर्धेतील दोन्ही पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला. पिचड तसेच त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी अशोक भांगरे या दोघांची प्रभाव क्षेत्रे या गटात असल्यामुळे दोघांच्याही दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. मनसेमध्ये असणाऱ्या डॉ. लहामटे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. या गटात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. त्याचा फायदा लहामटे यांना झाला. बहुसंख्य आदिवासी गावांमध्ये भाजपला भरघोस मतदान झाले. धनगर आरक्षण प्रश्नांवर पिचड यांच्याकडून युतीवर सातत्याने होत असलेल्या प्रखर टीकेकडे आदिवासी मतदारांनी दुर्लक्ष केल्याचे मतदानातून दिसून आले. या पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या आंबड गावात सर्वाधिक म्हणजे ३९४ मते राष्ट्रवादीला जास्त पडली. मात्र पिचड यांच्या राजूरमध्ये पावणेचारशे मतांनी पिछाडीवर राहिला.
सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीमुळे उत्साह निर्माण झाला आहे. निवडणुकीचा निकाल हा जनतेचा विजय असून पिचड यांचा पराभव असल्याची प्रतिक्रिया अशोक भांगरे यांनी व्यक्त केली. धनशक्तीला जनशक्तीने पराभूत केल्याचे त्यांनी सांगितले. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार वैभव पिचड यांनी आमदारकीचा राजीनामा द्याावा व पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष जािलदर वाकचौरे यांनी केले.
निकाल-
किरण लहामटे (भाजप, विजयी)- ६ हजार ८४३, ज्ञानेश्वर काकड (माकप)- १ हजार ७३४, राजू कानकाडे (राष्ट्रवादी)- ५ हजार ५९०, नोटा- ३१७.

Congress candidate Praniti Shinde criticizes BJP in Solapur
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी काढली भाजपची लाज
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
Vanchit, Ramtek
वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?
solapur lok sabha congress candidate praniti shinde
सोलापुरात स्थानिक विकासावर ‘मुद्याचं बोला’; काँग्रेसचे भाजपला आव्हान