राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या पक्षाने मुखेड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत युती केली असून या पक्षाला काँग्रेसने दोन जागा सोडल्या आहेत.

जिल्ह्य़ातील नऊ नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी येत्या १८ तारखेला होणाऱ्या निवडणुकीचे चित्र बुधवारी दुपारनंतर स्पष्ट होईल. मुखेड नगर परिषदेवर मागील अनेक वर्षांपासून राठोड गटाची सत्ता आहे. राठोड परिवारातील डॉ. तुषार हे आता भाजपचे आमदार असून नगराध्यक्षपदासाठी त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर राठोड िरगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने ज्येष्ठ कार्यकत्रे व माजी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार यांना िरगणात उतरविल्याने चुरस वाढली आहे.

narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
Former MLA Dilip Mane is home in Congress after five years solhapur
माजी आमदार दिलीप माने पाच वर्षांनंतर काँग्रेसमध्ये स्वगृही

देबडवार यांची जनमानसातील प्रतिमा चांगली आहे तर राठोड परिवारावर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला आहे. भाजप-संघ विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना राठोड गटाने दूर लोटले. तसेच राज्याच्या सत्तेत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांनी सोबत घेतले नाही. या पक्षाच्या दोन उमेदवारांना काँग्रेसने आपल्या आघाडीत सामावून घेतल्याने भाजप व राठोड गटाची पंचाईत झाली. दशरथ लोहबंदे यांचा गटही काँग्रेससोबत असून अल्पसंख्याकांचे समर्थन देबडवार यांना मिळण्याची शक्यता असल्याने आम्हाला या वेळी यश मिळेल, असा दावा काँग्रेसचे, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी केला.

मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रपूर जिल्हय़ातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना दिलेल्या सूचना, त्यांचे बोलणे उघड झाल्यानंतर नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना लक्ष्य केले; पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्हय़ात जानकर यांचा पक्ष भाजपविरुद्ध असे दुसरे चित्र येथे समोर आले.

जानकरांची सभा

काँग्रेससोबत ‘रासप’ने समझोता केल्याच्या माहितीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. रासपचे नेते महादेव जानकर हे मुखेडमधील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १२ डिसेंबर रोजी सभा घेणार असल्याची माहिती तेथील तालुकाध्यक्षांनी दिली. शेख मनुद्दीन चाँदसाब, लक्ष्मीबाई नारनाळीकर व माया गायकवाड हे ‘रासप’चे तीन उमेदवार असून रेखा लोहबंदे व राहुल लोहबंदे हेही काँग्रेस आघाडीतील उमेदवार समजले जातात.