महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगावातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जवाब दो’ हे मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पुढील महिन्यातील २० ऑगस्ट रोजी ४ वर्षे होत आहेत. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एस.एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. मात्र त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. शासनासह तपास यंत्रणा तपासाबाबत गंभीर नाही म्हणून हे मूक आंदोलन करण्यात आले. फरार संशयिताना अटक करण्यात तपासी यंत्रणा का अपयशी ठरल्या?, अद्यापही आरोपी फरार का ? त्यांना अटक न करू शकण्यामागे काय कारणे आहेत? याची उत्तरे द्या, असे प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आले.

‘जवाब दो, जवाब दो’, डॉ.दाभोलकर अमर रहे ’,  ‘सनातनच्या खुनी साधकांना अटक करा’, अशा विविध घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. विचारवंतांच्या हत्येत सहभागी असलेले सनातनच्या सारंग अकोलकर, विनय पवार, प्रवीण निंबकर, जयप्रकाश हेगडे या साधकांची एनआयच्या वेबसाईटवरील फोटो, रेखाचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावावी, मानसिक औषधांचा वापर करून सामान्य माणसांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सनातन संस्थेची चौकशी एसआयटीकडून व्हावी, अशा विविध मागण्या अंनिसने यावेळी केल्या. अंनिस तसेच पुरोगामी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमृत महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव राजेंद्र चौधरी, शहर कार्याध्यक्ष हेमंत सोनावणे, सचिव पियुष तोडकर आदी यावेळी उपस्थित होते.

shashikant shinde, opposition false corruption allegations, mahesh shinde, shashikant shinde criticise mahesh shinde, satara lok sabha seat, ncp sharad pawar, sharad pawar, lok sabha election 2024,
सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे
maharashtra andhashraddha nirmulan samiti marathi news
महाराष्ट्र अंनिसने निवडणुकीतील उमेदवारांवर कारवाईची मागणी का केली ?
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश