तालुक्यातील अणुस्कूरा मार्गावरील रायपाटण िखडीमध्ये सुमारे वीस ते पंचवीस वर्षीय तरूणांचा जळलेल्या स्थितीमध्ये मृतदेह आढळल्याने पाचल परिसरासह तालुक्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, त्या तरूणाची अद्यापही ओळख पटलेली नसल्याने तो तरूण नेमका कुठला आहे, त्याचा नेमका घातपात झाला आहे की अन्य काय ? याचा उलगडा करण्याचे आव्हान राजापूर पोलिसांपुढे ठाकले आहे.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक, सहाय्यक पोलिस अधिक्षक तुषार पाटील, डीवायएसपी मारूती जगताप, पोलिस निरिक्षक विकास गावडे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

रायपाटण िखड येथील मार्गावररून सकाळी ७ वाच्या सुमारास जात असलेल्या ट्रक्टर चालकाला एक मानवी देह जळत असल्याचे निदर्शनास आले. त्याने लागलीच गावचे प्रभारी सरपचं राजेश नलावडे आणि पोलिस पाटील महादेव नेवरेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी करून राजापूर पोलिसांशी संपर्क साधला. थोडय़ाचवेळाच रायपाटण पोलिस दूरक्षेत्रावरील पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मृतदेह जळत्या स्थितीमध्ये होता. दरम्यान, या घटनेची माहिती पाचल परिसरामद्य्ो पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरविली. त्यामध्ये त्यांनी पाचल विद्यालयासह रायपाटण येथील शासकीय वसतीगृह येथे जावून चौकशी केली. मात्र, या सर्व ठिकाणी मुले सुखरूप असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे नेमका मृतदेह कोणाचा याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांच्या सुरू असलेल्या पंचनाम्याच्यावेळी त्या मृतदेहाच्या तोंडातून जीभ बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या तरूणाचा प्रथम गळा आवळण्यात आला आणि त्यानंतर त्याचा रायपाटण िखडीत मृतदेह आणून त्याला जालण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जळलेल्या स्थितीमध्ये आढळलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्याचा लखून झाला की अन्य काही, त्यातच तो मृतदेह रायपाटणच्या िखडीत आला कसा असे विविध प्रश्न ठाकले असून त्यांचा उलगडा करत खुन्यापर्यंत पोहचण्याचे आव्हान राजापूर पोलिसांसमोर ठाकले आहे.