बहुमतासाठी संख्याबळ अपुरे

जिल्हा परिषदेत भाजपाचाच अध्यक्ष बनणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी ठामपणे सांगितले असले, तरी बहुमताची जुळणी करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बहुमताचा ३१ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने रयत विकास आघाडीचे ४ सदस्य गृहीत धरले असले तरी यापकी तीन सदस्यांनी अद्याप पािठब्याबाबत निर्णय घेतला नसल्याचे राहुल महाडिक यांनी सांगितल्याने सत्तेचे गणित मांडताना सावध भूमिका घ्यावी लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या ६० जागांपकी २४ जागा भाजपाने पक्षाच्या चिन्हावर आणि एक जागा पुरस्कृत अशा २५ जागा पटकावल्या आहेत. निकालानंतर सायंकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. देशमुख आणि खा. संजयकाका पाटील यांनी जिल्हा परिषेदत भाजपाचीच सत्ता असेल असे ठामपणे सांगितले. मात्र सत्ता स्थापनेसाठी कोणाचाही पाठिंबा घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र रयत विकास आघाडीचे ४ सदस्य भाजपाला पाठिंबा देतील असे सांगत असताना समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याचे संकेत दिले.

मात्र, याच वेळी वाळवा तालुक्यातून रयत विकास आघाडीचे चार सदस्य निवडून आले असले तरी यापकी ३ सदस्य भाजपासोबत जाण्यास बांधील नसल्याचे पॅनेलचे राहुल महाडिक यांनी सांगितल्याने भाजपासमोर अडचणी वाढल्याचे संकेत मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला खानापूरमधून निवडून आलेले ३ सदस्य शिवसेनेचे असून सत्ता स्थापनेत सेनेची महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

आ. अनिल बाबर यांनी मात्र याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी उपाध्यक्ष पद देण्याच्या बोलीवर ते भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला अध्यक्ष पदासाठी भाजपामधून दावेदारांची संख्या वाढली असून ज्येष्ठ नेते आणि खा. संजयकाका पाटील यांचे निकटवर्तीय डी. के. पाटील, माधवनगरचे शिवाजी डोंगरे, कडेगावचे संग्रामसिंह देशमुख हे दावेदार असून शिवसेनेच आमदार बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर हेही पाठींब्याच्या बदल्यात अध्यक्षपदाचा आग्रह धरण्याची चिन्हे दिसत आहेत.

सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जमविण्याची तयारी भाजपाची असून त्या दृष्टीने मोच्रे बांधणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाला राष्ट्रवादीने पािठबा दिला तर घेणार का? असा प्रश्न विचारला असता श्री. देशमुख यांनी शक्यता नाकारली नाही. यामुळे कदाचित सत्तेबाहेर राहुन राष्ट्रवादीही भाजपाच्या मदतीला येऊ शकते.