महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी (ता. ३० मे) जाहीर होणार आहे. ११ वाजता विभागवार निकाल घोषित केले जाणार आहेत. तर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०१७ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहेत. दुपारी १ पासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत. तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ते पाहता येणार आहेत.

http://www.mahresult.nic.in

http://www.result.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

http://www.knowyourresult.com/

http://www.rediff.com/exams

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादीत केलेले गुण पाहता येथील. तसेच त्याची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार आहे.

मोबाईल एसएमएसद्वारेही निकाल जाणून घ्या

बीएसएनएल ग्राहकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHHSC टाईप करा. स्पेस द्या. त्यानंतर आसन क्रमांक टाकावे आणि ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवा.

दरम्यान, बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचे पीक आले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचे वातावरण होते. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.