बम बम भोले.च्या अखंड स्मरणात श्री त्र्यंबकेश्वरसह शहर परिसरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी शिव मंदिरे गर्दीने फुलली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंदिरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासह नाशिक येथील कपालेश्वर, सोमेश्वर आदी मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर येथे पहाटे पाच वाजता अभिषेकासह लघुरूद्र व अन्य धार्मिक विधी झाले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडून भाविकांना मुख्य मंडपात दर्शनासाठी सोडण्यात आले. तसेच देणगी दर्शनासाठीच्या गर्दीचा अंदाज घेत उत्तर दरवाज्याचा पर्याय निवडण्यात आला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली. मात्र काहींना चक्कर येणे, थकवा जाणवणे असा त्रास झाला. अशा भाविकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास मंदिर परिसरातून श्री त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक निघाली. कुशावर्त दर्शनानंतर पालखी गावात फिरली. पालखी पूजेचा मान असणाऱ्या मंडळीसह ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग घेतला.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

सायंकाळी पालखी मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जादा बंदोबस्त ठेवला. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात नारळ नेण्यास मनाई करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाने महाशिवरात्री निमित्त घोटी व मेळा स्थानक येथून जादा बसेस सोडल्या. दरम्यान, नाशिक

शहरातील कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर मंदिर यासह अन्य मंदिरातही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

येथील कपालेश्वर मंदिरात लोखंडी जाळ्या उभारत गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आले. सायंकाळी मंदिरातून कपालेश्वरची पालखी काढण्यात आली. अनेक शिव मंदिरात भजनी मंडळ, महिला मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजने सादर केली.