ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावर केलेली टीका ही त्यांची वैयक्तिक बाब असली तरी स्वतचे लक्ष वेधून घेण्यासाठी असली विधाने ते करीत असतात. यापूर्वी त्यांनी अशी वादळी विधाने केली असल्यामुळे त्यांच्या विधानाकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे मत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता रविभवनात पत्रकारांशी बोलत होते.  घुमानमध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेलो नाही. शिवाय, जाण्यासाठी फारसा उत्साह वाटला नाही. गोव्यातील संमेलनाचे अध्यक्ष कुसुमाग्रज असताना त्या एकमेव साहित्य संमेलनाला गेलो होतो.विल्यम शेक्सपीयरच्या साहित्यावर तीन खंड लिहिले आहे असून ते इग्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळाला दिले होते. इग्लंडमधील त्यांच्या स्मारकाजवळ तीन खंड अर्पण करण्यात आले होते. त्यावेळी तेथील लोकांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या मराठी भाषिकांकडून ते समजून घेतले होते. आपल्याकडे शेक्सपीयरचे साहित्य मोठय़ा प्रमाणात वाचले जात असले तरी कालिदासही तरुणांनी वाचले पाहिजे, असे पाडगावकर यांनी नमूद केले.
नेमाडे यांनी साहित्य संमेलनावर टीका केली ती इतरांचे स्वतकडे लक्ष वेधून घेण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे किंवा त्यांनी केलेल्या विधानांकडे फारसे गांभीर्याने मी पहात नाही. साहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया मला पटत नाही आणि त्या भानगडीत कधी पडत नाही. मला अध्यक्ष करा, असेही कधी म्हणालो नाही आणि अध्यक्ष होण्याची आवडही नाही. साहित्यक्षेत्रात रसिकांकडून जो मानसन्मान मिळाला तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. 
– पाडगावकर

स्फोटकांचा साठा जप्त  
अमरावती : अमरावती ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ येथे रविवारी एका घरावर छापा टाकून तब्बल १ हजार डायनामाईट जिलेटिनच्या कांडय़ा आणि ८० डिटोनेटर्ससह सुमारे ४ लाख १३ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.