मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

रायगड जिल्ह्य़ात रविवारी माणगाव येथे मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील विविध भागांतून मोर्चासाठी मोठय़ा संख्येने मराठा समाजबांधव या निमित्ताने दाखल होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई- गोवा महामार्गावर मोर्चाच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गानी वळवली जाणार आहे.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Recovery of installments on Shiv-Panvel highway bus drivers associations statement to Deputy Commissioner of Police
शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
Looting on the Mumbai Ahmedabad highway by Angadian
महामार्गावर अंगाडियांकडून सव्वा पाच कोटींची लूट; धारावीचा कुख्यात डॉनसह चौघांना अटक
kolhapur marathi news, shaktipeeth expressway marathi news, shaktipeeth expressway kolhapur marathi news
शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल

मराठा आरक्षण मोर्चा कृती समिती माणगाव यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोपर्डी हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गरवापर टाळण्यासाठी योग्य बदल, मराठा आरक्षण या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. रायगड जिल्ह्य़ात होणारा हा पहिलाच मराठा मोर्चा आहे. हा मोर्चा अमित कॉम्प्लेक्स निजामपूर रोड-एसटी स्टँड-कचोरी रोड माग्रे तहसीलदार कार्यालय माणगाव असा काढण्यात येणार असून जिल्ह्य़ातील मराठा समाज मोर्चाच्या निमित्ताने माणगावात दाखल होणार आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील माणगाव तालुक्याच्या हद्दीतील लोणेरे ते पोटणेर गावादरम्यान एकूण २२ कि.मी. अंतरापर्यंत रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीस बंदी आदेश प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.

या कालावधील महामार्गावरील सर्व हलक्या वाहनांची वाहतूक निजामपूर-बोरवाडी फाटा-हरवडी-काडापूर-ताम्हाणे-जाभूळपाडा ते ढालघर फाटा अशी वळविण्यात येणार आहे. या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी हे र्निबध असणार नाहीत.

मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर माणगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, ५० पोलीस उपनिरीक्षक, ३ महिला पोलीस उपनिरीक्षक, २१० पोलीस कर्मचारी, ८३ वाहतूक पोलीस, २० गोपनीय कर्मचारी, ३ दंगल नियंत्रण पथके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३ अ‍ॅम्ब्युलन्स, १ अग्मिशमन दलाची गाडी व १६ सीसी टीव्ही कॅमेरे असा प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मोर्चाला येणाऱ्या गाडय़ांसाठी १२ ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

 

सिंधुदुर्गात मराठा मोर्चात आठ तालुके सहभागी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मराठा मूकक्रांती मोर्चा आज रविवार २३ ऑक्टोबर रोजी निघणार आहे. या मोर्चाला सुमारे चार लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष अ‍ॅड्. सुहास सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांतून मराठा क्रांती मोर्चासाठी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या वाहने पार्किंगची सोय तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एकत्रित जमण्याची सोय करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेदेखील मूक मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर नियोजन केले आहे. या मूक मोर्चाची सुरुवात ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील ग्राऊंडवर किल्ल्याचा सेट उभा केला आहे तेथे रणरागिणी धडाकेबाज मनोगत व्यक्त करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मोर्चाकडे सर्वाचे लक्ष आहे. राजकीयदृष्टय़ा मराठा समाजाची एकजूट नेमकी किती होते याकडेही राजकीय तज्ज्ञांचे लक्ष आहे.