पंढरपूर मंदिर समिती आणि वाद हे समीकरण अद्यापही कायम असून, भाविकांना दर्शनाला सोडण्यावरून झालेल्या वादात मारहाणीच्या दोन घटना अलीकडेच घडल्या आहेत. हे प्रकरण साधे नसून त्यामागे ‘अर्थ’कारणाची चर्चा असून त्याची पाळेमुळे खोलवर गेली आहेत. कर्मचाऱ्यांना सरळ केले तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील.

सावळा विठुराया हा शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, आबालवृद्ध यांच्या अडी-अडचणीला धावणारा म्हणून श्रद्धा आहे. येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे बडवे-उत्पात यांच्याकडे सारा कारभार होता. त्या काळी दर्शन करणाऱ्या भाविकांची संख्या शेकडा होती, तर दर्शनाला तासन्तास रांगेत उभे राहत होते. त्या काळीही भाविकांना त्रास झाल्याचे बोलले जाते अशा तक्रारी होत्या. पुढे मंदिरातील बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क संपुष्टात आले. त्यावेळी मंदिरातील परिस्थिती बदलली आणि देव आणि भाविक यांच्यातील अडसर दूर झाला अशी भावना सामान्य वारकऱ्यांची झाली होती.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी मंदिर समितीमध्ये कर्मचारी, पुजारी यांची मोठी भरती केली. यामध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला खरा. या भरतीमधील अनेक कर्मचारी निष्ठेने आजही मंदिरातील जबाबदारी चोख बजावीत आहे. मात्र काही  कर्मचारी या संधीचे ‘सोने’ करणच्या उद्देशानेच काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पंढरपुरात मुख्य वारीशिवाय भाविक मोठय़ा संख्येने दर्शनाला येत आहेत. त्यात शनिवार, रविवारी पंढरी नगरी फुलून जाती. अर्थात येणारे भाविक हे दर्शनाला येतात. इथे येणारे भाविक हे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट करून पुन्हा आपल्या गावी जातात. त्यामुळे कमी वेळात दर्शन घेण्यावर सर्वांचाच भर असतो. यासाठी मग सुरू होतो दर्शनाचा शॉर्टकट. मग समितीमधील काही  कर्मचाऱ्यांचे नेटवर्क एवढे तगडे आहे की परगावचे भाविक त्यांना सहज भेटतात. मग त्या भाविकाला दर्शन घडवून आणले जाते. मंदिरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक, मंदिर परिसरातील फुलविक्रेते असे अनेकजण परगावच्या भाविकांना दर्शन घडवून आणतात.

गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न

या साऱ्या पाश्र्वभूमीवर मंदिर समितीने असे गरप्रकार रोखण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यामध्ये ऑनलाइन दर्शन सेवा, घुसखोरी थांबविण्यासाठी जागो जागी बॅरॅकेटिंग, सुरक्षारक्षक, स्वतंत्र पोलीस चौकी आदी उपाय योजना आजही कार्यान्वित आहेत. असे अभेद्य कवच असताना दर्शनासाठी पसे घेतले जातात. यासाठी तुझा माणूस नंतर आधी माझी माणसे दर्शनाला सोडा या वरून वादविवाद आणि पुढे जाऊन हाणामारीपर्यंत मजल जाऊन पोहचली आहेत. दोन कर्मचाऱ्यांत याच कारणावरून तर चार दिवसापूर्वी मंदिर समितीचे व्यवस्थापकांना रस्त्यावर झालेली माराहाण याच कारणावरून झाली आहे. आता या सर्व पाश्र्वभूमीवर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणे, मंदिरात भाविकांना दर्शनासाठी दर्शन रांगेशिवाय सोडले जाऊ नये यासाठी तपासणी केली जावी. ऑनलाइन दर्शनाची सेवा अधिकाधिक भाविकांना घेता यावी यासाठी समितीने प्रयत्न करावे. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी पसे देऊ नये अशा आशयाचे मराठी, हिंदी, कन्नड, तेलगु भाषेत बोर्ड लावावेत. दर्शनासाठी पशाच्या मागणीबाबत भाविकांनी तक्रार दाखल केली तर तत्काळ कारवाई करावी, तर मुंबई उच्च न्यायालयाने नवीन समिती घटित झाल्यावर जुन्या समितीने नेमलेल्या कर्मचारी यांच्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

निर्णयाची प्रतीक्षा

मंदिर समितीमधील कर्मचारी यांचे तुटपुंजे मानधन आहे. या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध वेतनाचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. नव्याने अस्तित्वात आलेली समिती आणि अध्यक्ष डॉ. भोसले यांनी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. भाविकांना सुलभ दर्शन देणार असे नुसते न बोलता सावळ्या विठुराया आणि भाविक यांच्यातील अंतर कमी होणे गरजेचे आहे. मंदिर समितीची दुसरी बठक २३ ऑगस्टला होणार आहे. आता या बठकीत काय निर्णय होणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.