दामोदर नाईक यांच्या पुढाकाराने मडगांव, गोवा येथील रवींद्र भवनमध्ये सुमन सुगंध हा कार्यक्रम सुमन कल्याणपूर यांच्या उपस्थितीत सादर झाला. रसिकांनी या कार्यक्रमास तुडुंब गर्दी केली होती. सुमनताईंच्या अक्षय मराठी व हिंदी गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करालगीकर या गुणी व कसलेल्या कलावंतांनी समरसून गीते सादर केली. कार्यक्रम निवेदन तसेच सुमनताईंना बोलते करण्याचे काम अर्थात मंगला खाडिलकर यांनी केले. सुमनताईंच्या सांगीतिक जीवनाचा परामर्श घेताना त्यांच्या विषयी खूप खोलवर चर्चा केली. आजही मधुर असलेला त्यांचा गळा व हृदयाची आस ठेवून गाण्याची शैली यामुळे गोवेकर भारावून गेले.
मराठी वाङ्मय परिषद बडोदे पारितोषिक वितरण सोहळा
अखिल भारतीय व स्थानिक साहित्य स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ, अभिरुची गौरव पुरस्कार असे दोन्ही कार्यक्रम वाङ्मय परिषदेने आयोजित केले. हे कार्यक्रम प्रेमानंद साहित्य सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. अनिल काणे, डॉ. विजय पाठक, डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ गणेश देवी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या तरुण पिढीमध्ये संवाद साधला जात नसल्याची खंत व्यक्त केली. मराठी वाङ्मय परिषदेविषयी प्रशंसोद्गार काढले डॉ. अनिल काणे व डॉ. विजय पाठक यांनीही आपले मौलिक विचार मांडले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबादच्या छाया महाजन यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. याच वेळी एक छोटासा मराठी िहदी गाण्यांचा कार्यक्रम निवेदक हेमंत बर्वे व मुंबईच्या गायिका पल्लवी केळकर यांनी सादर केला.
चां. का. प्रभु विद्योत्तेजक मंडळी  आयोजित विद्यार्थी मीलन समारंभ
(शिल्पा कुलकर्णी)
हल्ली शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अनेक विषय, विविध शाखा आणि अगणित संस्था उपलब्धव आहेत. साधारणत: १०वी आणि १२वीनंतरच्या विद्यार्थ्यांना पुढे काय शिकावे? कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, वगेरे प्रश्न सतावत असतात. हे निवडताना कोणत्या गोष्टींचा आधार घ्यावा, मुख्यत: हेच कळत नाही. आणि मग कोणाची तरी इच्छा म्हणून, आई, वडील मागे लागले म्हणून किंवा मित्र म्हणतात म्हणून किंवा अमुक विषयात आता जरा जास्त मार्क्‍स मिळालेत म्हणून, असे काही तरी आधार, परिस्थितीमुळे दिशा बदलावी लागते. पालकही या काळात आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतातच असे नाही. एकूण विद्यार्थी आणि पालक या काळात अत्यंत गोंधळून जातात, तणावात राहतात. आणि अशा परिस्थितीत योग्य निर्णय करतातच असे नाही. जर काही खोटा निर्णय केला गेला, तर त्या विद्यार्थाला आयुष्यभर ती गोष्ट सतावत राहते. म्हणून या अती महत्त्वाच्या वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, आपुलकीने, मनमोकळे पणाने बोलता यावे म्हणून चां. का. प्रभु विद्योत्तेजक मंडळी दरवर्षी ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह आमंत्रित करते आणि आपल्याच समाजातील श्रेष्ठ, अनुभवी व आदर्श व्यक्तींनी या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधावा असा प्रयत्न दर वर्षी करत असते. असाच एक प्रयत्न या वर्षीसुद्धा विद्यार्थी मीलन समारंभाच्या स्वरूपात करण्यात आला. या समारंभात सुरत एस.व्ही.आई.टी.चे एसोसिएटेड प्रोफेसर डॉ. विकास प्रधान, पारुल इंस्टिटय़ुटच्या बीबीए फॅकल्टीच्या प्रिन्सिपल फाल्गुनी रणदिवे आणि वल्लभ विद्यानगरचे डॉ. सुधीर गुप्ते खास उपस्थित होते. जवळजवळ ६०-६५ विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळविले आणि व्यक्तिगत संवादही साधला. या मंडळींनी खालीलप्रमाणे ठळक मुद्दे विद्यार्थ्यांसमोर मांडले. डॉ. विकास हरिशचंद्र प्रधान यांनी दोन मुद्दे चांगले मांडले, एक म्हणजे आíथक परिस्थिती नसल्यास १०वी पास होऊन बरेच कोर्सेस आहेत. ते करून कुटुंबाला हातभार लावण्यास लवकर मदत होते. दुसरा मुद्दा, १०वीत चांगले मार्क्‍स असल्यास डिप्लोमाला प्रवेश घेणे. कारण असे आढळून आले आहे, की १०वीपेक्षा १२वीत मार्क्‍स कमी येतात आणि मग हवी ती लाइन घेता येत नाही. शिवाय मुलांनी व पालकांनी स्वत:शी ओनेस्ट असावे. म्हणजे आपण कोणत्या लेवलला आहोत व कुठपर्यंत जाऊ शकतो याचा नेहमी विचार करावा. पालकांनीसुद्धा पाल्याबाबत आशावादी असावे, परंतु पाल्याच्या १०वी किंवा १२वीपर्यंतच्या रिझल्टकडे पाहून त्याला एखादी लाइन घेण्यास मदत करावी. मुलांना आवडीची लाइन घेऊन द्यावी. प्रधान म्हणाले की फक्त नोकरी किंवा पगार यासाठी शिक्षण घेऊ नये. शिकल्याने आपली विचारशक्ती विकसित होते व त्यामुळे उत्तम जीवन जगता येते. फाल्गुनी रणदिवे यांनी विद्यार्थ्यांनी कोठल्याही university मध्ये Admission   घेताना त्या  uni.  ची चौकशी करावी कारण हल्ली बऱ्याचशाFake Universities निघाल्या आहेत. त्यासाठी त्यांनी दोन  Web-Site  सुचवल्या त्या अवश्य पडताळून पाहाव्यात. मुलांनी Smart Phone   चा उपयोग शैक्षणिक माहिती घेण्यासाठी जास्त करावा.Facebook, Twiter वैगेरे Web-site  पाहाव्या, परंतु त्याच बरोबर  Google Search ला जाऊन जगात काय चालले आहे हे पाहण्यास जास्त वेळ द्यावा. सध्या आर्ट्समध्येसुद्धा विविध विषय घेऊन पुढे करिअर करता येते. अनेक क्षेत्रात जाऊन जीवनात काही तरी वेगळे करण्याचा आनंद घेता येतो. डॉ. सुधीर गुप्ते यांनी सांगितले की शिक्षणाला वयाचे बंधन नाही. स्वत: ५५व्या वर्षी Ph.D. झाले. कायम विद्यार्थीच राहावे. शिक्षणाला पर्याय नाही. त्यांनीसुद्धा   University Select  करण्यावर भर दिला. स्वत: विद्यार्थ्यांनी University  मध्ये जाऊन Faculty, Laboratories, Uni. Grade    बघावे व Faculty  बरोबर  Discussion करून मगच  Admission   घ्यावे, असे सुचवले. चांगल्या University  मध्ये Admission   मिळत असल्यास घर सोडावे लागले तरी सोडावे.  Govt. नोकरीत आपली मुले जात नाहीत. तरी त्या Services कडे दुर्लक्ष करू नका, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सांगितले, की शिक्षणाची दिशा नक्की करताना आíथक बाबीचा विचार करावा, पण खऱ्या अर्थाने जीवनात काही विशेष करायचेच असेल तर तसे शिक्षण घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे व त्यासाठी जरूर लागल्यास समाजाच्या संस्थांचा सहकार ध्यावा. कारण आता पशांअभावी कोणाचे शिक्षण थांबले असेल तर ते आपल्याला परवडणार नाही व यासाठी आपल्या संस्थाही आता सक्षम होत चालल्या आहेत. फक्त विद्यार्थी आणि पालकांनी नि:संकोच बोलले पाहिजे.
‘पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न’
सारंग खटी लिखित ‘SIP OF THE SEA’ या लहान मुलांच्या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे २ जुल रोजी केंद्रीय रस्ते-वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक इंग्रजी असून यात लहान मुलांच्या कथा आहेत अशी माहिती यावेळी पुस्तकाचे प्रकाशन व व्हिजन अ‍ॅनालेटिक्सचे सह-संस्थापक जीवन तळेगावकर यांनी दिली. यात लहान मुलांना आवडतील अशा ‘कृष्णा’ नावाच्या मुलाच्या १० साहस कथा आहेत. लहान मुलांना या पुस्तकातून मूल्यव्यवस्थेसंबंधी जाणीव होईल, असा विश्वास यावेळी सारंग व जीवन या उभायतांनी व्यक्त केला.