वाई तालुक्यातील एकसरमध्ये लहान बहिणीने मोठ्या बहिणीची हत्या केली आहे. यानंतर लहान बहिणीनेदेखील आत्महत्या केली आहे. या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोन बहिणींना सोडवण्यास गेलेल्या वडिलांवरही लहान बहिणीने वा केले आहेत. या घटनेने वाई तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता सीमा विशाल गायकवाडने (वय वर्षे २८) तिची मोठी बहिण हेमा अरविंद कळंबेवर (वय वर्षे ३०) चाकूने हल्ला केला. सीमाने मोठा बहिणीच्या पोटात सुरा भोसकून तिचा खून केला. यानंतर सीमाने आत्महत्या करत स्वत:ला संपवले. यावेळी दोन बहिणींना सोडवण्यास गेलेल्या वडिलांना चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वाई तालुका हादरला आहे.