मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सुकेळी खिंडीत गॅस टँकर उलटल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक बारा तास उलटून गेल्यानंतरही अद्याप विस्कळीत असल्याचे समोर येत आहे. काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक वाकणरोहा-कोलाडमार्गे वळवण्यात आली होती. काल गॅस टँकरमधून वायुगळती सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास हा अपघात झाला होता.
tanker1