एमएच-सीईटी परीक्षा गुरुवार, ७ मे रोजी सकाळी ९ ते १ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा जिल्ह्य़ातील १८ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. बुलढाणा व चिखली शहरातील परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून ५ हजार ४७५ परिक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. उमेदवारांनी परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, रायटिंग पॅड व काळ्या शाईचे बॉलपेन आणावे. या व्यतिरिक्त साहित्य उमेदवारांनी आणू नये. या परीक्षेसाठी १८ उपकेंद्रप्रमुख, २४९ समवेक्षक, ६१ पर्यवेक्षक, ३६ लिपीक आणि ५० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर कलम १४४ लावण्यात आलेली आहे.