काँग्रेसचे आमदार तसेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करणारे भाजप नगरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा आणि त्यांचा सहकारी राहुल श्रीवास सोमवारी पोलिसांपुढे शरण आले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषदेत शिव शर्मा यांनी गुंडगिरी करीत ९ एप्रिल रोजी गोपालदास अग्रवाल यांना मारहाण केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. अखेर या प्रकरणात सोमवारी दोन्ही आरोपींना अटक झाली.
काँग्रेस आमदार अग्रवाल यांना मारहाण
आमदार अग्रवाल यांनी गेल्या एका वर्षांत केलेल्या कामांची व गोंदियातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयातील उच्च न्यायालयातील जनहित याचिका, तसेच एमसीआयने काढलेल्या २३ त्रुटींची माहिती देण्यासाठी हॉटेल ग्रँड सीतामध्ये ९ एप्रिलला पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी गोपालदास अग्रवाल गेल्या वर्षभरात विरोधी पक्षातील आमदार असूनही भाजप-सेना सरकारशी लढा देत आपल्या मतदारसंघासाठी कोटय़वधींच्या निधीची कामे खेचून आणल्याचे सांगून भाजपची सत्ता असलेल्या गोंदिया पालिकेतील भोंगळ कारभाराची पत्रकारांना माहिती देत होते. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास नगरसेवक शिवकुमार शंकरलाल शर्मा व त्यांचा सहकारी राहुल श्रीवास हे दोघे या पत्रकार परिषदेत शिरले व कुणाला काहीही न विचारता सरळ गोपालदास अग्रवालांजवळ जाऊन त्यांना असभ्य शिवीगाळ करून बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात त्यांचा सहकारी राहुल श्रीवास यानेही शिवीगाळ करून गोपालदास यांना मारहाण केली. यात आमदारांच्या गालावर मारहाणीने जखमा झाल्या, नाकातून रक्त निघू लागले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांनी मध्यस्थी करून त्यांना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हॉटेलबाहेर काढले होते.

kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
MP Dhairyashil Mane should be in Delhi when Narendra Modi takes oath for the third time says Suresh Halvankar
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने दिल्लीत हवेतच- सुरेश हाळवणकर
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले