तिघांविरुद्ध गुन्हा

घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करीत तिचा विनयभंग करण्याचा आणि त्यात संशयिताच्या आई-वडिलांनी चिथावणी देत वाद घातल्याची घटना शिंदखेडा गावात घडली. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा शहरातील लक्ष्मी नारायण कॉलनीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला घरासमोर राहणारा सुरेंद्र ऊर्फ सागर बापू निकवाडे (२८) हा तरुण त्रास देत होता. गेल्या ८ ते १० दिवसांपासून तो तिचा पाठलाग करत असल्याने तिने हटकले असता त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे मुलगी सागरच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्यास गेली. तेव्हा सागरच्या आई-वडिलांनी उलट चिथावणी देत शिवीगाळ केली. सागरने मुलीचा हात धरत विनयभंग केला. या घटनेमुळे भेदरलेल्या मुलीने सुटका करुन घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित सुरेंद्र ऊर्फ सागर बापू निकवाडे, बापू तुकाराम निकवाडे आणि सरलाबाई बापू निकवाडे या तिघांविरुद्ध पॉस्को कायद्यानुसार तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.