मुंबई -गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सहा वर्षे रखडले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होण्याची शक्यता आहे. इंदापुर ते कशेडी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे ९० टक्के भूसंपादन पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम या महिन्याअखेपर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे.

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २०११ मध्ये पळस्पे ते इंदापुर या पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

आता इंदापुर ते झाराप या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही लवकरच सुरु होणार आहे. ४५० किलोमिटरच्या या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी जवळपास १३ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाच्या कामात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन, भूसंपादन प्रक्रीया पूर्ण केल्याशिवाय रस्त्यांच्या कामाला सुरूवात करायची नाही. असा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानुसार आता भूसंपादनाचे काम अंतिम टप्यात आले आहे. रायगड जिल्ह्य़ातील इंदापुर ते कशेडी दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेपकी ९० टक्के भूसंपादन पुर्ण झाले आहे.

रायगड जिल्ह्य़ात दोन टप्प्यात मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. यात पळस्पे ते इंदापुर आणि इंदापुर ते कशेडी या दोन टप्प्यातील कामांचा समावेष आहे. पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम यापुर्वीच सुरु झाले आहे. ८४ किलोमिटरच्या या मार्गासाठी एकुण २१७ हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार असून यापकी २०० हेक्टर क्षेत्र संपादीत झाले आहे. अद्यापही १७ हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे, पहिल्या टप्प्यातील भुसंपादनासाठी ४७६ कोटी रुपये प्राप्त झाले होते. यातील ४०७ कोटी रुपये प्रकल्पबाधितांना मोबदला म्हणून वितरीत करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात इंदापुर ते कशेडी या ७१ किलोमिटर मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी ४७ गावातील २३० हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. यापकी २२० हेक्टर जमिन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या भूसंपादनासाठी शासनाकडून ५४१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापकी ३९० कोटी रुपये प्रकल्प बाधितांना मोबदला म्हणून वितरीत करण्यात आले आहे.

संपादनाची प्रक्रीया पूर्ण झालेल्या एकुण जागेपकी ७० हेक्टर जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आला असून उर्वरीत जागेचा ताबाही या महिन्या अखेपर्यंत दिला जाणार आहे. उर्वरीत १० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन या महिन्या अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे लवकरच मुंबई- गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होईल. अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

निविदा प्रक्रीया अंतिम  टप्प्यात असल्याने पावसाळ्यानंतर महामार्ग रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. अशी महिती महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.