३५व्या राज्यस्तरीय ज्युनियर मुले महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने विजेतेपद तर भंडारा संघाने उपविजेते पद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सांगलीने नाशिकचा (२९-१६) पराभव केला.
सिंधुदुर्ग जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनच्या वतीने ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत जिमखाना मैदानावर ३५वी राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा  घेण्यात आली. त्यात राज्यभरातील ३० संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईने भंडारा संघावर दणदणीत विजय मिळवीला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनिल सुरकुटे, प्रकाश कमाने, राजेश चव्हाण, व इतरांनी पाहिले. उपांत सामन्यात सांगलीने पुण्यावर (२४-२३), मुंबई उपनगरने लातूरवर (३१-११), नाशिकने कोल्हापूरवर (२०-१९), तर भंडाराने सोलापूरवर (२८-१९) मात करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला.