भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस आमदार पंकजा मुंडे यांच्यासह डॉ. प्रीतम खाडे व अॅड. यशश्री या मुलीही राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. पुन्हा संघर्ष यात्रेनंतर पंकजा यांचा राज्याच्या राजकारणात राहण्याकडेच कल असल्याने त्या परळी विधानसभेची, तर डॉ. प्रीतम खाडे लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तिसरी कन्या अॅड. यशश्री दोन्ही बहिणींसाठी पूर्ण वेळ मदतनिसाच्या भूमिकेत असतील. मागील १५ दिवसांपासून या तिघींनी परळी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.
गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या राजकीय वारस परळीच्या आमदार पंकजा मुंडे यांना तत्काळ केंद्रात मुंडे यांच्या जागी घ्यावे, अशी मागणी झाली. प्रदेश भाजपनेही ठराव पाठविला. मात्र, ३ महिन्यांनंतरही पक्षाने पंकजा यांना प्रतीक्षेतच ठेवले. दरम्यान, पंकजा यांनीही मला अनुकंपावर पद नको तर मेरिटवर द्या, असे ठणकावत पुन्हा संघर्ष यात्रा काढली. यात्रेला मोठे जनसमर्थन मिळाले. त्यामुळे पंकजा यांनी राज्याच्याच राजकारणात राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांतून पुढे आली. पंकजा यांनीही राज्यातच राहण्याकडे कल असल्याचे बोलून दाखवले.
विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूक असल्याने पंकजा परळीतून पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तर लोकसभेसाठीही डॉ. प्रीतम खाडे यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी मागील ४ दिवसांपासून परळीत दौराही सुरू केला. मुंडेंची तिसरी कन्या अॅड. यशश्री याही मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या तिन्ही मुली राजकारणात सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?