कृष्णा नदीत गेले दोन महिने वास्तव्यास असलेल्या मगरीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आले असून अज्ञाताविरुध्द वनविभागाकडे सोमवारी फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे पीपल्स फॉर एॅनिमल संघटनेचे कार्यकत्रे अशोक लकडे यांनी सांगितले.
    सांगलीजवळ कृष्णा नदीच्या पात्रात गेले दोन महिने मगरीचे वास्तव्य होते. या मगरीला पकडण्यासाठी वन विभाग गेले काही दिवस प्रयत्न करीत होता. मगरीला पकडण्यासाठी िपजराही लावण्यात येत होता. मात्र मगर अद्याप सापडली नव्हती.
    तथापि, काही दिवसांपूर्वी कसबे डिग्रजच्या शिवारात एका मगरीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून मृत मगर नदीकाठीच पुरण्यात आली असल्याचे शनिवारी उघडकीस आले. मगरीच्या पाठीवर गोळीच्या खुणा आढळून आल्या असल्याने अज्ञाताविरुध्द वनविभागाकडे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे लकडे यांनी सांगितले.