23 October 2017

News Flash

Nanded Mahanagarpalika Result : नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’, भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम

नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते.

मुंबई | Updated: October 12, 2017 5:42 PM

महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. काँग्रेसने ७१ जागांवर विजय मिळवला असून भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. ८१ जागांपैकी ७१ जागांवर काँग्रेस तर भाजप ५, शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे. तर तीन जागांची मोजणी सुरु आहे. एमआयएमचा काँग्रेसला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, या निकालावरून नादेंडकरांनी एमआयएमलाही नाकारल्याचे दिसते. एमआयएम, राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांनी नांदेडमध्ये ‘अशोकपर्व’च असल्याचे दाखवून देत भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम घातला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच सत्ता मिळवणार असा दावा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. पण निकालावरून भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम लागल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओवेसी बंधूंनी नांदेडमध्ये सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती. मंत्री संभाजी पाटील निलंगेकरही नांदेडच्या प्रचारात सक्रीय झाले होते.

शहरातील विकासात्मक कामे काँग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच त्यांनी आम्हाला स्वीकारले. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिली आहे. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. या प्रचाराला नांदेडकरांनी दिलेले हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत होते.

Updates : 

– प्रभाग ९ मधील काँग्रेसचे विजयी उमेदवार: पूजा पवळे, किशोर स्वामी, मनमितकौर, प्रशांत तिडके

– काँग्रेसने ३० ठिकाणी विजय मिळवला

– प्रभाग १ ड मध्ये शिवसेनेला यश, बालाजी कल्याणकर विजयी

– हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे.

– काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- बेगम शबाना नासेर, फरहत सुलताना, नागेश कोकुलवार

– निवडणुकीच्या सहा महिन्याआधी एमआयएम सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या ६ पैकी ४ जण विजयी

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- फारूख अली खान, अपर्णा नेरलकर

– काँग्रेसचा २१ ठिकाणी विजय

– १२ जागांवर काँग्रेस विजयी

– प्रभाग १९ मध्ये भाजप उमेदवार विजयी, शांता गोरे यांचा विजय

– नांदेड पालिकेत भाजपने खाते उघडले

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- महेंद्र पिंपळे, जयश्री पावडे, राजीव गोविंद काळे

– अशोक चव्हाण राहत असलेल्या शिवाजी नगर परिसरातही काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.

– प्रभाग ५ मध्येही काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी

– प्रभाग ११- काँग्रेसच्या रझिया बेगम विजयी

– काँग्रेस ८ जागांवर विजयी, २८ जागांवर आघाडीवर

– प्रभाग ११- काँग्रेसचे मसूद अहमद खान विजयी

– काँग्रेस २५ तर भाजप ३ जागांवर आघाडीवर

–  प्रभाग ११- काँग्रेसच्या आशिया बेगम अब्दुल हबीब विजयी

– प्रभाग ११ मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

– प्रभाग ११ मध्ये काँग्रचे सय्यद शेर अली विजयी

– पहिले निकाल लागले असून काँग्रेसचे चार उमेदवार विजयी

–  सुरूवातीच्या टप्प्यात अशोक  चव्हाण यांचा गड कायम राहण्याची शक्यता

– काँग्रेस २२, भाजप एका जागेवर आघाडीवर

– काँग्रेस १७, भाजप ४ तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर

– गत निवडणुकीत काँग्रेसला ४२, शिवसेना १४, भाजप २, एमआयएम ११ आणि संविधान पार्टीला २ जागा मिळाल्या होत्या.

– शिवसेना २ तर एमआयएम २ जागांवर आघाडीवर

– सुरूवातीचे कल हाती आले असून काँग्रेस १६ तर भाजप ८ जागांवर आघाडीवर

–  प्रथम पोस्टल मतमोजणीला सुरूवात

– सकाळी १०.०५ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

–  ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार होते. ६० टक्के झाले होते मतदान

–  एकूण ५५० मतदान केंद्रांवर मतदान झाले

–  एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत

 

First Published on October 12, 2017 10:40 am

Web Title: nanded waghala mahapalika result 2017 live nanded waghala municipal corporation bjp congress shiv sena aimim