ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उपविभाग एटापल्लीच्या पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीतील मंडोली जंगल परिसरात सी-६० पथक नक्षल शोधमोहीम राबवित असतांना शुक्रवारी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार व दोन जखमी झाले आहेत. नक्षल्यांच्या कसनसूर दलमने कोटमी पोलिस मदत केंद्रावर हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही शोधमोहीम सुरू केली होती.  मंडोली जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता जोर पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीत त्यांची मोठी हानी झाली असून मोहीम तीव्र करण्यात आली आहे.