नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षनेत्यांकडून झालेल्या पक्षपातीपणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून खळबळ उडवून दिली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. अध्यक्षपद काँग्रेसला मिळाल्यानंतर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. यापूर्वी उपाध्यक्षपदाची संधी किनवट तालुक्याला मिळाली होती तर एक सभापतिपद कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाला मिळाले होते.
उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोण, हे ठरवण्यासाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून आमदार जयप्रकाश दांडेगावकर शनिवारी दुपारी नांदेडात दाखल झाले. पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आमदार प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्याशी चर्चा केली. आ. दांडेगावकर यांनी त्यानंतर पालकमंत्री डी. पी. सावंत व काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. सदस्यांच्या भावना ऐकल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याकडे आपला अहवाल कळवला.
निरीक्षक असलेल्या दांडेगावकर यांच्याकडून एखाद्या ज्येष्ठ सदस्याला न्याय मिळेल, असे वाटत होते. पण बहुतांश सदस्यांचा भ्रमनिरास झाला. आज सकाळी हॉटेल चंद्रलोकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची बठक निरीक्षक दांडेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. याच बठकीत उपाध्यक्षपदासाठी दिलीप धोंडगे यांचे नाव दांडेगावकर यांनी जाहीर केल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर रागारागाने बाहेर पडले. उपाध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यापूर्वीच निरीक्षक यांनी पक्षाच्या सर्व सदस्यांना पक्षादेश (व्हीप) जारी केला होता. गोरठेकर बठकीतून बाहेर रागारागाने पडल्यानंतर त्यापाठोपाठ त्यांचे नऊ समर्थकही बठकीबाहेर गेले. कलामंदिर परिसरातल्या गोरठेकर यांच्या निवासस्थानी या सर्व सदस्यांची एक बठक पार पडली. पक्षाचे निरीक्षक व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या पक्षपातीपणाबद्दल संताप व्यक्त करून या ९ सदस्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवले.
मोहन पाटील टाकळीकर, मारोतराव कवळे, पांडुरंग गायकवाड, रमेश सरोदे, मीनाक्षी कागळे, सुरेखा कदम, नंदाताई पवार, कमलबाई पाटील व ललिता चिंतलवार या ९ सदस्यांनी राजीनामे पाठवले खरे, पण अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश शिरसावंद्य मानून आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले.
नांदेडची राष्ट्रवादी काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधण्याचा उद्योग पक्षाच्याच काही नेत्यांनी केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. एका नवख्या सदस्याच्या हाताखाली आम्ही काम कसे करावे, असा सवाल करून प्रदेशाध्यक्षांनी आमचे राजीनामे स्वीकारावेत, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली.
उपाध्यक्षपदासाठी नायगाव, उमरी, धर्माबाद, नांदेड या तालुक्याला संधी मिळेल, असे सर्व सदस्यांना वाटत होते. कंधार-लोहा व किनवट वगळता कोणत्याही तालुक्याला उपाध्यक्षपदाची संधी द्या, असे साकडे १८ पकी १० सदस्यांनी घातले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
काँग्रेसने कोणाला संधी द्यावी याचे सर्व अधिकार अशोक चव्हाण यांना दिले होते. श्री. चव्हाण यांनी औरंगाबादला रवाना होण्यापूर्वी गुंडले यांचे नाव निश्चित केले होते. वास्तविक काँग्रेस पक्षासाठी हितकारक असलेल्या सौ. कमळेकर यांना संधी न देता अशोक चव्हाण यांनी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्या शाब्दिक प्रहाराला बळी पडत कमळेकर यांच्यावर अन्याय केल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुंडिले यांना संधी मिळाल्याने नांदेड दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे समर्थक सुखावले असले तरी नायगाव, धर्माबाद, उमरी तालुक्यातील काँग्रेसचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…