गोपीनाथ मुंडे, शिवाजीराव पंडित, आता जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्य़ातील मातब्बर नेते. या तिघांबाबत एक साम्य म्हणजे तिघांच्या पुतण्यांनी काकांना शह दिला आहे. विशेष म्हणजे राजकारणासाठी कोणाचे घर फुटू नये असे जाहीरपणे सांगणाऱ्या अजित पवारांच्याच आश्रयाला या तिन्ही नेत्यांचे पुतणे जाऊन बसल्याने राष्ट्रवादीत आता ‘पुतणेशाही’चा प्रभाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे, केशरबाई क्षीरसागर आणि शिवाजीराव पंडित या दिग्गज राजकीय नेत्यांच्या कुटुंबांत पुतण्यांच्या बंडाने नवी राजकीय समीकरणे उदयाला आणली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ातील तिन्ही राजकीय घराण्यांतील पुतणे राष्ट्रवादीत विसावले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे पुत्र आमदार जयदत्त क्षीरसागर पक्षात आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर क्षीरसागरांनी पक्षाबरोबर राहावे यासाठी स्वत: शरद पवार यांनी क्षीरसागर यांच्या घरी जाऊन त्यांना सोबत घेतले. क्षीरसागरांचा जिल्ह्य़ात प्रभाव असल्याने मागील पंधरा वर्षांत राष्ट्रवादीत क्षीरसागरांचा शब्द प्रमाण होता. दोन वेळा मंत्री, पालकमंत्री, बीड नगरपालिकेत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सत्ता कायम होती. मात्र नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागरांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बंड करून काकांविरुद्ध आघाडी केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीतही दोन्ही काकांना आव्हान दिले. परिणामी बंडखोर पुतण्यावर कारवाई व्हावी यासाठी दोन्ही काकांनी पक्षाचे उंबरठे झिजवले. मात्र पुतण्याच्या बंडाला पक्षातूनच फूस असल्याचे कळल्यानंतर स्थानिक पातळीवर क्षीरसागर बंधूंनीही अप्रत्यक्षपणे इतर पक्षांना मदत करीत पुतण्याला रोखले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत उलथापालथीत अखेर पक्षाचे नेते अजित पवार यांनी उघडपणे शहरात येऊन क्षीरसागर बंधूंना बाजूला करीत पुतणे संदीपला पाठबळ दिले. कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी राजकारणासाठी कोणाचे घर फुटावे अशी आपली भावना नाही, असे जाहीरपणे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र बंडखोर पुतण्याला सोबत घेऊन योग्य तो संदेश दिल्याचे लपून राहिले नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड केल्यानंतर अजित पवार यांचा आश्रय घेतला. पवार यांनीही धनंजय यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी देऊन त्यांचे नेतृत्व विकसित करण्यास बळ लावले.

गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे बंधू माजी मंत्री बदामराव पंडित हे राष्ट्रवादीत असतानाच पुतणे अमरसिंह पंडित यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाच वर्षे पंडित काका-पुतण्यातील कुरघोडीच्या राजकारणानंतर अखेर काका बदामराव पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली सुटका करून घेतली. त्यामुळे पुतणे अमरसिंह यांना राष्ट्रवादीत पूर्णपणे मोकळीक मिळाली.

धनंजय व अमरसिंह हे दोन पुतणे राष्ट्रवादीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विसावलेले असतानाच आता या दोन्ही पुतण्यांनी क्षीरसागर कुटुंबातील पुतणे संदीप यांनाही राष्ट्रवादीत बळ देऊन क्षीरसागर काकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ‘पुतणेशाही’ प्रबळ झाल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.

पुतण्याला पक्षाच्या नेतृत्वाकडूनच बळ मिळत असल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नाराज झाले आहेत. आधीच धनंजय मुंडे यांना पक्षाने ताकद दिली. क्षीरसागर आणि मुंडे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यातच पक्षाच्या नेतृत्वाला पुतण्या अधिक प्रिय वाटू लागल्याने भविष्यात जयदत्तअण्णा कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्य़ातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे, केशरबाई क्षीरसागर आणि शिवाजीराव पंडित या दिग्गज राजकीय नेत्यांच्या कुटुंबांत पुतण्यांच्या बंडाने नवी राजकीय समीकरणे उदयाला आणली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ातील तिन्ही राजकीय घराण्यांतील पुतणे राष्ट्रवादीत विसावले आहेत.राष्ट्रवादीत आता ‘पुतणेशाही’चा प्रभाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

जयदत्त क्षीरसागर नाराज ?

पुतण्याला पक्षाच्या नेतृत्वाकडूनच बळ मिळत असल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नाराज झाले आहेत. आधीच धनंजय मुंडे यांना पक्षाने ताकद दिली. क्षीरसागर आणि मुंडे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यातच पक्षाच्या नेतृत्वाला पुतण्या अधिक प्रिय वाटू लागल्याने भविष्यात जयदत्तअण्णा कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्य़ातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.