पक्षी आणि प्राण्यांच्या शरीरात विविध रोगांचे जिवाणू व विषाणू पसरविणारे आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे गोचीड (हायलोमा प्रजाती) प्रथमच कबरा वन घुबडा (मॉटेल वूड आऊल) च्या शरीरात आढळले आहेत. येथील पशुवैद्यक अधिकारी डॉ. बहार बाविस्कर यांनी ही नोंद केली असून, यापूर्वी भारतात अशी नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे, या गोचिडीपासून घुबडाचा बचाव करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
हायलोमा प्रजातीच्या गोचिडीमुळे विविध आजार वेगाने पक्षी आणि प्राण्यांच्या शरीरात पसरतात. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांच्या ‘वाइल्ड सीईआर’ या संस्थेकडे जखमी अवस्थेतील कबरा वन घुबड उपचारासाठी आणले. त्या वेळी त्याच्या पंखाला फ्रॅक्चर असल्याने त्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना घुबडाच्या शरीरावर बारीक लिखा आणि डोळ्याजवळ गोचीड आढळले. तब्बल सहा-सात दिवसांनंतर प्रयोगशाळेत तपासणीअंती ते हायलोमा प्रजातीचे गोचीड असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्रात त्याची काही नोंद आहे का हे पाहिले. महाराष्ट्रात नोंद मिळाली नाही म्हणून त्यांनी भारतातील इतर राज्यांतील नोंदी शोधल्या, तेव्हा कुठेही त्याची नोंद आढळली नाही. त्यामुळे त्यांनी शिकारी पक्ष्यांवर काम करणाऱ्या ग्रीन नेटवर्कच्या वैज्ञानिकांशी संपर्क साधला.
भारतातही त्यांनी डॉ. सतीश पांडे, डॉ. नवरे या पक्षितज्ज्ञांशी संपर्क साधला असता कुणीही त्यावर काम केलेले नव्हते. त्यामुळे इंग्लंडच्या रॅफ्टर नेटवर्क वाचनालयात संपर्क साधला, तर तेथेही ही नोंद नव्हती. डॉ. सतीश पांडे यांना २०१२ मध्ये पुणे येथे कबरा वन घुबडाचे घरटे आढळले होते. त्यामुळे इला फाऊंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी डॉ. बाविस्कर यांना निबंध पाठवायला सांगितला. अलीकडेच हा निबंध ‘इला जर्नल ऑफ फॉरेस्ट अँड वाइल्डलाइफ’मध्ये प्रकाशित करण्यात आला.

‘‘वन्यप्राणी किंवा पक्ष्यांना होणारे बरेच आजार हे अनेकदा पाळीव प्राण्यांमुळेसुद्धा होतात. हायलोमा प्रजातीच्या गोचिडाबाबत अभ्यास झालेला नाही. घुबडाच्या शरीरातील त्याचा शिरकावही प्रथमच उघडकीस आला. त्यामुळे अशा प्रजातींवर किंवा त्यांच्या प्राणी आणि पक्ष्यांच्या शरीरातील प्रवेशावर परजीवी शास्त्रज्ञांनी संशोधन करणे गरजेचे आहे. कारण यापुढे अशी स्थिती उद्भवली तर संशोधनाने ते सिद्ध करता येईल.’’
   – डॉ. बहार बाविस्कर,     संस्थापक, वाइल्ड-सीईआर

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?