भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा उत्कृष्ट क्रिकेटपटू अनिल ऊर्फ बंटी मंजुळे (वय ४०) यांचे रविवारी सायंकाळी अपघाती निधन झाले आहे. बीडहून उस्मानाबादकडे लग्नसमारंभ आटोपून येत असताना भरधाव बसगाडीने त्यांच्या कारला तेरखेडाजवळ जोराची धडक दिली. या अपघातात मंजुळे यांच्यासोबत प्रवास करणारे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंजुळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच उस्मानाबाद शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविलेले भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक बंटी मंजुळे यांच्या अपघाताचे वृत्त सायंकाळी ५ च्या सुमारास शहरात धडकले. काही क्षणात शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून या तरुण कार्यकर्त्यांला श्रध्दांजली अर्पण केली. एका लग्नसमारंभासाठी अनिल मंजुळे मित्रांसह बीड येथे गेले होते. लग्नसमारंभ आटोपून बीडहून उस्मानाबादकडे परतत असताना त्यांच्या होंडा सिटी (एमएच २५/८०१०) या गाडीला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने तेरखेडा गावानजीक समोरासमोर जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, गाडी चालविणारे मंजुळे यांचा जागेवर मृत्यू झाला. त्यांच्यासह प्रवास करणाऱ्या तिघांना तत्काळ खासगी रुग्णवाहिकेमधून उस्मानाबाद येथील सुविधा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप

अपघाताचे वृत्त शहरात पसरताच सर्वत्र एकच गोंधळ उडाला. उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मागील पाच वर्षांपासून सातत्याने ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करणारा हा कार्यकर्ता गेल्याची बातमी सर्वाच्याच मनाला चटका लावणारी होती. दररोजप्रमाणे तुळजाभवानी क्रीडासंकुलावर जमा झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहात होत्या. सुविधा रुग्णालयासमोर बंटी मंजुळे यांचा मित्र परिवार, नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा रहदारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

अपघाताचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जगताप, डॉ. धीरज वीर, डॉ. गोविंद कोकाटे, नगरसेवक तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, अमित शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.