विभाग : ख
‘मराठी वाङ्मय परिषद, बडोदे’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्यिकांसाठी कथा/ कविता/ ललित निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे रु. ५०१, ३०१, २०१ अशी रोख बक्षिसे आणि प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. बडोदे ज्या साहित्यिकांच्या नावाने ओळखले जाते, अशा मान्यवर साहित्यिकांच्या नावे असलेल्या पुरस्कारांनी यशस्वी स्पर्धकांना सन्मानित करण्यात येते. त्याशिवाय उत्तेजनार्थसुद्धा पारितोषिके देण्यात येतील. साहित्यिकांनी आपली साहित्यकृती (कथा/ कविता/ ललित निबंध) दिनांक ३१.१२.२०१५ पूर्वी खालील पत्त्यावर पोहोचेल अशा प्रकारे पाठविण्याची व्यवस्था करावी.
स्पर्धेचे नियम :- ’ साहित्य स्वतंत्र असावे, पूर्वप्रसिद्धी/ पारितोषिक मिळालेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. ’ साहित्य कागदाच्या एकाच बाजूला टंकलिखित केलेले अथवा सुवाच्य अक्षरात लिहिलेले असावे. साहित्यावर स्वत:चे नाव लिहू नये. एका वेगळ्या कागदावर स्वत:चे नाव, संपूर्ण पोस्टल अ‍ॅड्रेस, दूरध्वनी क्रमांक/ भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी लिहून तो कागद त्या साहित्यासोबत जोडावा.
’ निबंधासाठी शब्दसंख्या मर्यादा १००० शब्दांची राहील. निबंधासाठी निश्चित विषय परिषदेकडून दिलेले नाही. ’ पारितोषिकांस योग्य साहित्य न आल्यास पारितोषिके दिली जाणार नाहीत. ’ प्रथम क्रमांकाचे साहित्य शक्य असल्यास अधिवेशनप्रसंगी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत छापण्यात येईल.
’ वरील प्रत्येक साहित्य प्रकारात किमान पाच स्पर्धक असणे आवश्यक आहे. ज्यात नसतील त्या साहित्याची स्पर्धा घेतली जाणार नाही. ’ प्रत्येक साहित्य प्रकारात फक्त एक एक कृती स्वीकारण्यात येईल. स्पर्धक वरील सर्व स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील.
’ प्रवेश शुल्क प्रत्येक साहित्य प्रकारास प्रत्येक कृतीस रु. ५० (रुपये पन्नास) प्रवेश शुल्क राहील. प्रत्येक साहित्यकृतीबरोबर रोख किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, रावपुरा शाखा, अकाऊंट नं. ६०१२८३१०८०७ या खात्यात जमा करून खालील पत्त्यावर पावती पाठवावी. ’ संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात समारंभाध्यक्षाच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होईल. पारितोषिक घेण्यास बडोद्यास स्वखर्चाने यावे लागेल. परंतु अधिवेशनप्रसंगी पारितोषिक घेण्यास आल्यास विजयी स्पर्धकांस एका वेळेचे दुसऱ्या वर्गाचे रेल्वेभाडे/ बसभाडे देण्यात येईल आणि बडोद्यातील एका दिवसाच्या पाहुणचाराची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल. ’ साहित्य कुठल्याही परिस्थितीत परत पाठविले जाणार नाही. कृपया पोस्टेज पाठवू नये. स्पर्धकाने स्वत:च्या साहित्याची योग्य ती प्रत स्वत:पाशी ठेवावी.
’ परीक्षकांचा निर्णय अखेरचा असेल. त्यात कुठलाही बदल होणार नाही.

विभाग : घ

’ विनोदी कथासंग्रह/ लेखसंग्रह ’ आत्मचरित्र / आत्मकथन ’ प्रवासवर्णन
’ अनुवादित साहित्य स्पर्धा- गुजराती-मराठी, मराठी-गुजराती
वरील साहित्य प्रकारांतील सवरेकृष्ट कलाकृतीस प्रत्येकी रु. ५०१चे पारितोषिक देण्यात येईल. ’ प्रवेश शुल्क प्रत्येक साहित्य प्रकारास प्रत्येक कृतीस रु. ५० (रुपये पन्नस) प्रवेश शुल्क राहील. प्रत्येक साहित्यकृतीबरोबर रोख किंवा अकाऊंट नं. ६०१२८३१०८०७ बँक ऑफ महाराष्ट्र रावपुरा शाखा, या खात्यात जमा करून खालील पत्त्यावर पावती पाठवावी.

विभाग : ग
अभिरुची गौरव पुरस्कार पारितोषिक योजना
कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, निबंधसंग्रह, कादंबरी व नाटक या साहित्य प्रकारांत प्रत्येकी एक पारितोषिक ‘अभिरुची गौरव पुरस्कार’ या नावाने देण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप रु. १००१ रोख, प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह असे असते व हा पुरस्कार संस्थेच्या अधिवेशनात समारंभाध्यक्षांच्या हस्ते देण्यात येतो.
पुरस्कारासाठी प्रकाशित साहित्यकृती प्रकाशक, लेखक अथवा इतर कोणीही पाठवू शकेल. मात्र साहित्यकृतीची किमान एक प्रत परिषदेला दिनांक ३१.१२.२०१५ पर्यंत खालील पत्त्यावर मिळणे आवश्यक आहे. ’ प्रत्येक साहित्य प्रकारास प्रत्येक कृतीस रु. १०० (रुपये शंभर) प्रवेश शुल्क राहील. प्रत्येक साहित्यकृतीबरोबर रोख किंवा अकाऊंट नं. ६०१२८३१०८०७ बँक ऑफ महाराष्ट्र, रावपुरा शाखा, या खात्यात जमा करून खालील पत्त्यावर पावती पाठवावी.
पत्रव्यवहाराचा पत्ता : पद्माकर पानवलकर, श्री दत्तभुवन, १९ गणेशवाडी, खंडेराव मार्केट मागे, बडोदे-३९०००१. भ्रमणध्वनी- ०९९२५६०००२८,
http://www.vangmayparishadbaroda.org
संपर्क : सकाळी- ९.३० ते १०.३०, सायंकाळी- ६च्या पुढे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

अश्विन खरे यांची नियुक्ती
आपल्याला सूचित करताना आनंद होतो की, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे युवा व सक्रिय सदस्य व बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या त्रमासिक पत्रिका ‘बृहन् माय मराठी’चे प्रधान संपादक अश्विन खरे यांना मध्य प्रदेश शासनातर्फे ‘मराठी साहित्य अकादमी’च्या प्रमुखपदी नियुक्त केले गेले आहे. बृहन्महाराष्ट्रातील मध्य प्रदेश हे असे राज्य आहे जेथे ‘मराठी साहित्य अकादमी’ची स्थापना केली गेली आहे व मराठी साहित्य, संस्कृती व परंपरेची जोपासना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्विन खरे यांच्या या नियुक्तीसाठी बीमएमचे कार्याध्यक्ष विलास बुचके, उपाध्यक्ष शेखर कीबे, महासचिव रवी गिऱ्हे, सचिव सुधीर परेतकर, कोषाध्यक्ष दिलीप कुंभोजकर व सहकोषाध्यक्ष दीपक कर्पे तसेच संपूर्ण कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे. तसेच मध्य प्रदेश शासनाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
 रेखा गणेश दिघे  -rekhagdighe@gmail.com