कोयना धरणक्षेत्रात पावसाची उघडीप कायम आहे. धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी दिवसभर कमालीच्या उष्म्यानंतर ढग दाटून येत आहेत. काल सायंकाळी ४ नंतर कोसळलेल्या धो धो पावसाने कराड परिसराची दैना उडवून दिली. आज दिवसभरात कोयना पाणलोटामध्ये २ एकूण सरासरी ४२८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाची जलपातळी २,१५४.७ फूट, तर पाणीसाठा ९३.७६ म्हणजेच ८९ टक्के आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कराड तालुक्यात १७.८ एकूण ४३८.८९ तसेच पाटण तालुक्यात ३.५ एकूण १,४५८.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल सायंकाळी शहर परिसरात अचानक कोसळलेल्या जोरदार पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले. तळमजल्यावरील दुकान गाळय़ात पाणी घुसून लाखोंची हानी झाली आहे.