जिल्हय़ातील विधानसभेच्या बारापैकी सात जागाच राष्ट्रवादीकडे असल्या तरी, त्यांनी सर्व मतदारसंघांत इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. जिल्हय़ातील बाराही मतदारसंघांत पक्षाकडे तब्बल ६० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. ही संख्या राहुरीत सर्वाधिक म्हणजे १४ आहे. अकोले, नेवासे व  पाथर्डी-शेवगाव येथे अनुक्रमे वैभव पिचड, आमदार शंकरराव गडाख व आमदार चंद्रशेखर घुले अशा दोघांनीच पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रवादीने जिल्हय़ातील सर्वच मतदारसंघांतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. बुधवापर्यंतच त्याची मुदत होती. याच काळात मुंबईला पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही हे अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत. त्याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र नगरचे महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी नगरला अर्ज दाखल केलेला नाही.
अन्य ठिकाणच्या इच्छुकांची मतदारसंघनिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत. नगर शहर- किरण काळे, विनीत पाऊलबुद्धे, स्मिता पोखर्णा, शेख शाकीर, अंबादास गारुडकर. कर्जत/जामखेड- राजेंद्र फाळके, शहाजी राळेभात, नानासाहेब निकत, शिवाजी अनभुले, राजेंद्र गुंड, राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, काकासाहेब तापकीर, सोनाली बोराटे. संगमनेर- रामराव थोरात, कृष्णराव शिंदे, अशोक इथापे. डॉ. राजेंद्र पिपाडा, सरूनाथ उंबरकर, धनंजय जाधव. कोपरगाव- बिपीन कोल्हे, नितीन औताडे. श्रीरामपूर- सुनीता गायकवाड, नीलेश भालेराव, सुनील क्षीरसागर, विलास ढोंबळे, भाऊसाहेब शेजवल. राहुरी- प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, प्राजक्त तनपुरे, दत्तात्रेय अडसुरे, अमोल जाधव, शब्बीर देशमुख, अरुण तनपुरे, अमृत धुमाळ, अण्णासाहेब बाचकर, निर्मला मालपाणी, परसराम भगत, गोविंद मोकाटे, बापूसाहेब गाडे, बाळासाहेब खुळे. पारनेर- सबाजी गायकवाड, काशिनाथ दाते, माधव लामखडे, शैला भाईक, राजेंद्र शिंदे, उदय शेळके, सुजित झावरे, मधुकर उचाळे, खंडू भुकन, सुभाष लोंढे, अशोक सावंत, पोपटराव पवार, दीपक पठारे. श्रीगोंदे- केशव बेरड, अण्णासाहेब शेलार, राजश्री पवार, घनश्याम शेलार.