तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील माडबन येथील समुद्रकिनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी समुद्र कासवाची प्रजाती असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळली आहेत. त्यामध्ये सुमारे १३७ हून अधिक अंडी असून समुद्र किनारपट्टीवरील वाळूमध्ये खड्डा खोदून त्यांचे सुरक्षित ठिकाणी वनविभागाने स्थानिकांच्या साथीने संवर्धन केले आहे. त्यामुळे सतत दुसऱ्या वर्षी माडबनवासियांना पुन्हा एकदा ऑलिव्ह रिडले कासवांचा थरारक जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.

तालुक्याला लाभलेल्या पश्चिम सागरी किनारपट्टीच्या भागामध्ये विविध दुर्मिळ प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वी वारंवार आढळून आले आहे. मात्र, ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर यापूर्वी कधीही आढळली नव्हती. मात्र, गतवर्षी प्रथमच तालुक्यातील माडबनच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या मादीने अंडी घातल्याचे ग्रामस्थांना आढळून आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या ऑलिव्ह रिडले कासवाची तब्बल १३७ हून अधिक अंडी माडबन किनारपट्टीवर शामसुंदर गवाणकर यांना आढळली आहेत. वनपाल सागर गोसावी, दीपएक चव्हाण, स्थानिक ग्रामस्थ गवाणकर, संतोष राजापकर, चंद्रकांत आडीवरेकर आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने या अंडय़ाचे वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने वाळूमध्ये खड्डा खोदून सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. या अंडय़ांना श्वापदांपासून धोका पोहचू नये म्हणून जाळीही लावण्यात आली आहे. त्यातच, ज्या ठिकाणी अंडय़ाचे संवर्धन करण्यात आले आहे त्या ठिकाणी अंडी संवर्धित करण्यात आल्याचा फलकही लावण्यात आला आहे. वनविभागाने सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. या अंडय़ांमधून सुमारे ५३ ते ५५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर येऊन पुढील जीवनप्रवासासाठी समुद्राकडे झेपावणार आहेत. त्यामुळे माडबनवासियांना पुन्हा एकदा ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांचा थरारक समुद्रप्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!